Join us

पुरुषांच्या 'या' ५ घाणेरड्या सवयी महिलांसाठी ठरतात घातक, आरोग्यावर होतो परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2025 11:30 IST

men’s bad habits affecting women’s health: harmful habits of men for women: relationship health tips for women and men: पुरुषांच्या अशा काही सवयी आहेत, ज्यामुळे महिला आजारी असतात, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

प्रेमात सारं काही माफ असतं. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन नात्यात कुरबुर सुरु असते. प्रेम, लग्न किंवा नातं ही फक्त भावना नाही तर एकमेकांच्या छोट्या सवयी, स्वभाव आणि वागण्यावरही टिकून राहतं.(Relationship tips) लग्नानंतर किंवा लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी एकमेकांच्या सवयी आरोग्यावर थेट परिणाम करतात. अनेकदा पुरुषांच्या काही घाणेरड्या किंवा दुर्लक्षिलेल्या सवयी महिलांसाठी धोकादायक ठरतात.(men’s bad habits affecting women’s health) सुरुवातीला या गोष्टी छोट्या वाटतात परंतु नंतर याचा परिणाम नात्यांसह शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.(harmful habits of men for women) स्त्रियांना स्वच्छता अधिक प्रमाणात आवडते. त्यामुळे त्या घर जितकं स्वच्छ ठेवतात, तितेकच त्यांना आपले आरोग्य स्वच्छ असावे असे वाटते.(how men’s habits affect partner’s health) घरातील वातावरण नीटनेटके ठेवण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात. पण पुरुषांच्या काही वाईट सवयींमुळे त्यांचे आरोग्य बिघडे, ज्यामुळे त्या कायम आजारी असतात.(men’s lifestyle mistakes that hurt women) ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी पुरुषांच्या अशा काही सवयी सांगितल्या ज्यामुळे महिला आजारी असतात, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर 

तरुण मुलांच्या ‘या’ ५ सवयी मुलींना फार आवडतात, प्रेमात पाडतात! तुमच्याकडे आहेत हे गुण?

1. डॉक्टर म्हणतात पुरुषांनी आपली नखे स्वच्छ ठेवायला हवी. नख खूप लांब असतील आणि ती स्वच्छ नसतील तर यात सहजपणे बॅक्टेरिया आणि घाण जमा होते. यातील जंतू पार्टनरच्या खाजगी भागात संसर्ग पसरवू शकतात. यामुळे बुरशीजन्य आणि योनीमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. यासाठी आपली नखे नेहमी स्वच्छ आणि लहान ठेवा. 

2. काही पुरुष आंघोळ करणं टाळतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला नुकसान होत नाही पण जोडीदाराला नुकसान होऊ शकते. घाम आणि धूळ अनेकदा शरीरावर बॅक्टेरिया जमा करतात. जर पुरुष दिवसातून एकदा आंघोळ करत असतील किंवा आंघोळच करत नसतील तर यामुळे त्यांच्या जोडीदारामध्ये त्वचेच्या समस्या वाढतात. स्वच्छता राखण्यासाठी डॉक्टर दिवसांतून दोन वेळा आंघोळ करण्याचा सल्ला देतात. 

3. अनेक पुरुषांना स्मोकिंग करण्याची सवय असते. पण यामुळे त्यांच्या फुफ्फुसांनाच हानी पोहोचत नाही तर जोडीदाराच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. डॉक्टर म्हणतात की स्मोकिंगच्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाचे आजार, अॅलर्जी आणि गर्भधारणेच्या समस्या वाढतात. 

4. बऱ्याचदा पुरुष लघवी करताना टॉयलेट सीट व्यवस्थित स्वच्छ करत नाही. ही सवय महिलांसाठी अधिक धोकादायक ठरते. घाणेरड्या सीटमध्ये बॅक्टेरिया आणि जंतुंचे प्रमाण जास्त असते. यामुळे महिलांना युटीआयच्या मार्फत धोका अधिक वाढतो. 

5. याव्यतिरिक्त डॉक्टर सांगतात पुरुषांनी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी संपूर्ण शरीराची स्वच्छता करावी. विशेषता जवळीक साधण्यापूर्वी हात धुवायला हवे. यामुळे हातावरील जंतू थेट महिलांच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना युटीआयचा संसर्ग वाढू शकतो. या सवयी किरकोळ वाटू शकतात पण यांचा महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Men's dirty habits that harm women's health: A warning.

Web Summary : Men's unhygienic habits, like uncleanliness, poor toilet habits, and smoking, significantly impact women's health, leading to infections, respiratory issues, and fertility problems. Maintaining hygiene is crucial.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप