Lokmat Sakhi >Relationship > जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको..

जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको..

Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy : सुसंवादाचे महत्व सांगत रितेश देशमुखने सांगितले त्याच्या आनंदी संसाराचे गुपित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 17:24 IST2025-04-08T17:23:02+5:302025-04-08T17:24:24+5:30

Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy : सुसंवादाचे महत्व सांगत रितेश देशमुखने सांगितले त्याच्या आनंदी संसाराचे गुपित.

Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy | जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको..

जेनेलिया आणि रितेश देशमुख सांगतात सुखी संसाराचं रहस्य, नवरा बायकोच्या नात्यात काय हवं, काय अजिबात नको..

गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण फार वाढले आहे. कारणे अनेक असतात. प्रत्येकाला त्याचा निर्णय स्वत: घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. (Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy)मात्र अनेक नाती शुल्लक कारणांसाठीही तुटताना आपण बघतो. नात्यांची व्याख्या बदलत चालली आहे. बदल जेवढा चांगला तेवढाच वाईटही ठरु शकतो. सेलिब्रिटी लोकांमध्ये तर उठसूट घटस्फोट घेतला जातो. (Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy)त्यांना फॉलो करणारे अनेक जण असतात. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनते.

मात्र एका जोडप्याला लोकांचे भरपूर प्रेम मिळते. त्यांनी त्यांचे नाते समाजासमोर तेवढे चांगले आणि सकारात्मक ठेवले आहे. ही जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलियाची. सोशल मिडियावर दोघेही फार अॅक्टीव्ह असतात. त्यांच्या मुलाखतींमध्येही त्यांचे प्रेम कायम दिसून येते. कोणतेही नाते असेच टिकत नाही, त्यासाठी दोघांनाही कष्ट घ्यावे लागतात. हे जेनेलिया आणि रितेश त्यांच्या मुलाखतींमधून सांगत असतात. बॉलिवूडसोसायटीच्या पेजवर सांगितल्याप्रमाणे, रितेशने त्याच्या आणि जेनेलियाच्या हेल्दी रिलेशनशिपचे गुपित सांगितले आहे.

रितेशने सांगितले, "भांडण प्रत्येक कपलमध्ये होतेच. मात्र ते किती लांबवायचे हे आपल्याला समजले पाहिजे. ताणल्याने गोष्टी तुटतात. आमच्या नात्याला आता २२ वर्षे झाली मात्र कधीही मर्यादा सोडून भांडलो नाही." आजचे भांडण कधीच उद्यावर न्यायचे नाही. त्याच दिवशी तो विषय संपला पाहिजे. दुसर्‍या दिवशी प्रसन्न मनानेच सुरवात करायची. मतभेद असतील तर एकमेकांच्या मतांचा आदर ठेवता आला पाहिजे. आपलंच खरं करायला जायचं नाही. समोरच्याचे ऐकून घेणे फार गरजेचे असते. दोघांनी एकमेकांचे ऐका मग काय चूक काय बरोबर ते ठरवा. पुढे रितेश म्हणाला, "माफी मागण्यामध्ये काहीच छोटेपणा नाही. भांडण झाल्यावर मनापासून माफी मागा आणि तो विषय सोडून द्या. नाही तर नात्यामध्ये दुरावा तयार होतो."    

रितेशने सांगितल्याप्रमाणे, प्रत्येकानेच आपल्या नात्यामध्ये समजूतदारपणे वागणे गरजेचे असते. एक लहानसे भांडण जर मनात घर करून राहिले,तर तुमचा संसार तुटू शकतो. त्यामुळे सुसंवाद साधणे गरजेचेच असते. प्रत्येक नात्यामध्ये मत मांडण्याचा अधिकार दोघांनाही असतो. दोन व्यक्ती एकत्र आल्यावर भांडण होणारच. मात्र त्या भांडणाचा मानसिक त्रास होत असेल तर मग ते नात्यासाठी चांगले नाही. भांडताना आपण  विचार करत नाही चुकीचे शब्द वापरले जातात. त्यामुळे भांडण चिघळते. रागावर ताबा ठेवता आला पाहिजे. रितेशने सांगितल्याप्रमाणे, भांडणं वेळीच संपवता आले पाहिजे.   
 

Web Title: Genelia and Riteish Deshmukh told about what they do to keep relationship healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.