Join us  

Does Sex Make You Gain Weight : सेक्स आणि वजन वाढ यांचा काही संबंध आहे का? लग्नानंतर वजन का वाढतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 3:13 PM

Does Sex Make You Gain Weight : लग्नानंतर वजनवाढ झाली की गैरसमजातून अनेकजण त्याचा दोष लैंगिक संबंधांना देतात, मात्र शास्त्रीय माहिती सांगते, ते खरं नव्हे..

लग्नानंतर ३ ते ६ महिन्यांत अनेकांचे वजन वाढते. विशेषत: महिलांचे वजन जास्त वाढते. पारंपरिक विचार असा की शरीरसंबंधांमुळे वजन वाढते. (Sex and Weight Gain) अनेक महिलांचे वाढते वजन आणि शरीरसंबंध, सेक्स यांचा काहीतरी संबंध आहे असं मानलं जातं. मात्र हा एक गैरसमज आहे. वजन वाढण्याचा संबंध सेक्सशी नसून  सेक्स हार्मोन्सशी आहे. यासंदर्भात जगभर गैरसमज दिसतात. मात्र वेळोवेळी यासंदर्भात अभ्यास झालेले आहे. (Having Too Much Sex Can It Make You Gain Or Lose Weight)

२०१९ मध्ये अमेरिकन नॅशलन लायब्ररी ऑफ मेडिसिन यांनी प्रसिध्द केलेल्या अभ्यासातही सेक्स करणं आणि त्यामुळे वजन वाढणं असा काहीही परस्पर संबंध दिसून येत नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्याउलट सेक्स हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाढते. कारण सेक्स हा एक उत्तम व्यायाम आहे. ते कॅलरी बर्न करते. त्यामुळे वजन वाढीशी त्याचा काहीही संबंध नाही. लग्नानंतर केवळ महिलाच नाही तर पुरुषांचेही वजन खूप वाढते. त्याची अन्य कारणं असू शकतात. (Sexual Health Tips)

हार्मोनल असंतुलन

हार्मोन्सच्या असंतुलनाची अनेक कारणे असू शकतात, जसे की आनुवंशिकता, ताण- तणाव, आहार, जीवनशैली, इतर हार्मोन्स इ. सेक्स हार्मोन्स इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि डीएचईए इ. याशिवाय पीसीओडी किंवा अकाली मेनोपॉज हे देखील महिलांचे वजन वाढण्याचे कारण असू शकते.

1) DHA - हे असे हार्मोन आहे, जे महिला आणि पुरुषांच्या लैंगिक संप्रेरकांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. त्याच्या कमतरतेमुळे वजनही वाढते.

2) इस्ट्रोजन - महिलांच्या अंडाशयातून आणि एड्रेनल ग्लँडमधून येत असलेल्या या हार्मोनमुळे महिलांचे वजनही वाढते.

 सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?

3) प्रोजेस्टेरॉन - हे देखील इस्ट्रोजेन प्रमाणेच कार्य करते. महिलांची लैंगिक परिपक्वता वाढवण्यासोबतच ते गर्भधारणेसाठी महिलांचे शरीर मजबूत करते. शरीरात प्रोजेस्टेरॉनची कमतरता असल्यास इस्ट्रोजेन अनियंत्रित होते, ज्यामुळे वजन वाढते.

४) हार्मोन्स असंतुलनाची लक्षणं

- कंबर आणि मांड्यांजवळ चरबी जमा होते- मासिक पाळी तारखेच्या मागे-पुढे- गरम वाफा येणे- योनीत कोरडेपणा- झोप न येणं

हस्तमैथून केल्यानं स्पर्म काऊण्ट कमी होतो, पुरुषांची फर्टिलिटी कमी होते, हे खरं आहे का?

- मूड स्विंग्स- सेक्स ड्राइव्ह कमी होणे- चिंता किंवा नैराश्य- जीवनशैलीतील बदल

फिटनेस आणि व्यायामाचा अभाव

लग्नानंतर अनेकदा लोक कम्फर्ट झोनमध्ये जातात आणि फिटनेस मागे टाकतात, त्यामुळे त्यांचे वजनही वाढते. तसेच लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडपी खूप फिरतात आणि बाहेर जेवतात, त्यामुळे वजनही वाढते. आनंदी आणि सुरक्षित नातेसंबंध खरोखरच भूक वाढवू शकतात. हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तणाव, चिंता आणि नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा. जंक फूड आणि तळलेले पदार्थ टाळा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप