Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना सुद्धा Adult Movies बघण्याचं व्यसन लागतं का? पाहा एक्सपर्टनी सांगितली याची कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:44 IST

Adult Movie Addiction in Women : महिला किंवा तरूणींना सुद्धा अ‍ॅडल्ट सिनेमे बघण्याचं अ‍ॅडिक्शन असतं का? असाही एक प्रश्न काहींच्या मनात येतो. तर यावर एक्सपर्टनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Adult Movie Addiction in Women : सामान्यपणे अ‍ॅडल्ट सिनेमे पुरूष किंवा तरूणच बघतात असं मानलं जातं. तरूणी असं काही करत नाहीत असा समज आहे. पण असं अजिबात काही नाहीये. तरूणी सुद्धा अ‍ॅडल्ट सिनेमे बघतात. तसेच अनेक सर्व्हेंमधून हे समोर आलं आहे की, भारतातील भरपूर अ‍ॅडल्ट सिनेमे बघतात, त्यात महिला किंवा तरूणींचं देखील प्रमाण मोठं आहे. अ‍ॅडल्ट सिनेमांबाबत आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक तरूणांना हे सिनेमे बघण्याचं व्यसन लागतं, अ‍ॅडिक्शन होतं. हे सिनेमे ते दिवसातून अनेकदा बघतात. तेव्हाच त्यांना हलकं वाटतं. पण मग महिला किंवा तरूणींना सुद्धा अ‍ॅडल्ट सिनेमे बघण्याचं व्यसन लागतं का? असाही एक प्रश्न काहींच्या मनात येतो. तर यावर एक्सपर्टनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

रणवीर अलाहबादिया याच्या एका पॉडकास्टमध्ये या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. या पॉडकास्टमध्ये डॉ. अंजली अत्रे यांनी माहिती दिली आहे. रणवीरने त्यांना विचारलं की, मुलींमध्येही अ‍ॅडल्ट सिनेमे बघण्याचा अ‍ॅडिक्शन असतं का? तर डॉ. अंजली म्हणाल्या की, 'हो मुलींमध्येही अ‍ॅडल्ट सिनेमे बघण्याचं अ‍ॅडिक्शन असतं. आम्ही अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत. मुली येतात आणि सांगतात की, त्यांना अ‍ॅडल्ट सिनेमांचं अ‍ॅडिक्शन आहे. हस्तमैथुनाचं अ‍ॅडिक्शन आहे. चिंता, तणाव दूर करण्यासाठी त्या अ‍ॅडल्ट सिनेमे बघतात, डोक्यात सुरू असलेल्या गोंधळापासून फोकस हटवण्यासाठी त्या असं करतात. आणि मग हळूहळू अ‍ॅडिक्शन होतं. हे सिनेमे त्या पाहतात, हस्तमैथुन करतात आणि यातून त्यांना रिलॅक्स वाटतं'.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1226849506005035/}}}}

पॉर्न हब वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय महिला अ‍ॅडल्ट सिनेमे मोठ्या प्रमाणात बघतात. भारतात ३१ वयापर्यंतच्या प्रत्येक १० पैकी ३ महिला अ‍ॅडल्ट सिनेमे बघतात. हे सिनेमे बघणं हा एक खाजगी विषय आहे. पण महत्वाचं हे आहे की, दुसऱ्यांना लैंगिक संबंध ठेवताना बघून जर आपल्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पडत असेल तर हे घातक ठरू शकतं.

अ‍ॅडल्ट सिनेमांचं अ‍ॅडिक्शन कसं दूर करावं?

मुळात अनेक एक्सपर्ट सांगतात की, हे सिनेमे बघण्याची सवय मोडण्याची असे वेगळे काही उपचार नाहीत. पण आपण सायकॉलॉजिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्टला भेटून आपल्या या सवयीबाबत सांगू शकता आणि त्यांच्याकडून काउन्सेलिंग घेऊ शकता. जर त्यांना आपल्याला ही सवय का लागली याचं कारण कळालं तर नक्कीच यावर योग्य तो मार्ग निघू शकेल आणि ही सवय मोडू शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Do women get addicted to adult movies? Experts reveal reasons.

Web Summary : Women can develop adult film addiction, using it to relieve stress. Experts recommend counseling to understand and break the habit, as it can negatively impact mental well-being. Studies show many Indian women consume adult content.
टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्य