आजकाल कंडोमचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.कंडोम वापरण्याची दोन मुख्य कारणं आहेत.(condom expiry date) हे केवळ गर्भधारणा रोखण्यासाठीच नाही तर लैंगिक संक्रमित संसर्गांपासून (STIs)संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो.(how long are condoms safe to use) कंडोम हा लेटेक्स रबरपासून तयार केला जातो.(expired condom side effects ) पण अनेकांना माहित नसेल की, कंडोमची सुद्धा एक्सपायरी डेट असते.(condom safety tips) अनेकजण कंडोम वापरतात पण त्यांना हे माहीत नसतं किंवा ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही की कंडोमचीही एक्सपायरी डेट असते.(how to check condom expiry date) आपण जर तारीख न पाहता वापरलं तर यामुळे आपल्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. (what happens if you use expired condoms)
पुरुषांच्या 'या' ५ घाणेरड्या सवयी महिलांसाठी ठरतात घातक, आरोग्यावर होतो परिणाम
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की कंडोम रबर चं बनलेलं असल्यामुळे ते कधीच खराब होत नाही. पण यात असणारे लेटेक्स, पॉलीयुरेथन किंवा पॉलीआयसोप्रिन या पदार्थांचं स्ट्रक्चर सैल होतं. ज्यामुळे ते सहज फाटू शकतं. फाटलेलं किंवा जुनं कंडोम हे आपल्यासाठी अनेक आजारांच घर असतं.
डॉक्टर सांगतात की, प्रत्येक कंडोमच्या पॅकेटवर तारीख दिलेली असते. हे साधारणत: ३ ते ५ वर्ष टिकत पण उष्णता, आर्द्रता आणि चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास खराब होते. बरेच लोक हे पाकिटात, कारच्या डॅशबोर्डवर किंवा पर्समध्ये महिनोनमहिने ठेवतात. ज्यामुळे ते लवकर खराब होते. कंडोम नेहमी थंड, कोरड्या जागी आणि तीक्ष्ण वस्तूंपासून लांब ठेवायला हवे.
तरुण मुलांच्या ‘या’ ५ सवयी मुलींना फार आवडतात, प्रेमात पाडतात! तुमच्याकडे आहेत हे गुण?
काही लोकांना असं वाटतं की कंडोमची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही ते काही दिवस वापरता येते. याची तारीख उलटून गेली की ते पूर्णपणे असुरक्षित मानलं जातं. याचा कोणताही विलंब धोकादायक ठरु शकतो. जर त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला सुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवता येतात. कंडोम वापरण्यापूर्वी त्याची तारीख तपासा तसेच ते पाकिटात कसेही ठेवू नका. एक्सपायर कंडोम वापरल्याने ते फाटण्याची शक्यता अधिक पटींनी वाढते. त्यातून HIV, हिपॅटायटिस, गोनोरिया, क्लॅमिडिया यांसारख्या लैंगिक आजारांचा धोका वाढतो. तसंच त्वचेवर खाज, अॅलर्जी किंवा इरिटेशनही होऊ शकतं. त्यासाठी कंडोम वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.