Join us  

रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 12:50 PM

Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Relationship: रणबीर कपूर आणि आलिया भट या बॉलीवूडच्या एकदम हॉट कपलचे नाते नेमके कसे आहे, याचा अंदाज बॉडी लँग्वेज एक्सपर्टनी (Body language expert) लावला आहे. बघा त्यांच्या नात्याबद्दल ते नेमकं काय सांगतात...

ठळक मुद्देतज्ज्ञमंडळींनी आता रणबीर आणि आलियाचे काही एकत्रित असणारे फोटो पाहून या दोघांचे नाते नेमके कसे आहे आणि भविष्यात ते कोणत्या वळणाने जाऊ शकते, याचे काही अंदाज बांधले आहेत.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट (Ranbir Kapoor and Alia Bhatt) हे दोघे म्हणजे सध्याचे बॉलीवूडचे एकदम जास्त चर्चेत असणारे कपल. त्यांच्या लग्नापासून त्यांची जी चर्चा सुरू आहे ती आता पार त्यांच्या लेकीपर्यंत म्हणजेच राहा कपूर (Raha Kapoor) हिच्यापर्यंत येऊनही सुरूच आहे. राहाला त्यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आणलं. त्यानिमित्ताने आता पुन्हा एकदा रणबीर- आलिया यांच्या केमिस्ट्रीची चर्चा सुरू आहे. आपल्या बॉडी लँग्वेजवरून स्वभाव, मनातल्या भावना ओळखणारे अनेक एक्सपर्ट असतात. या तज्ज्ञमंडळींनी आता रणबीर आणि आलियाचे काही एकत्रित असणारे फोटो पाहून या दोघांचे नाते नेमके कसे आहे आणि भविष्यात ते कोणत्या वळणाने जाऊ शकते, याचे काही अंदाज बांधले आहेत. (Body language expert's predictions about Ranbir Kapoor and Alia Bhatt’s relationship and their married life)

 

आलिया- रणबीर यांचे नाते कसे आहे याविषयी indiatimes.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार बॉडी लँग्वेज एक्सपर्ट पंडीत जगन्नाथ गुरुजी असं म्हणतात की त्यांचे दोघांचे एकत्रित फोटो पाहून असं आढळतं की त्यांचं नातं हे खूपच परिपक्व आणि एकमेकांना समजून पुढे जाणारं आहे.

जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

फोटोंमध्ये ज्या पद्धतीने रणबीर आलियाला पकडतो, त्याचं आलियाशी असलेलं डिप पॉझिटीव्ह कनेक्शन दिसून येतं आणि तो त्याच्या वैवाहिक जीवनात अतिशय आनंदी- समाधानी असल्याचं जाणवतं.

 

दुसरीकडे आलियाच्या बॉडी लॅंग्वेजवरूनही रणबीरविषयीचं तीव्र प्रेम दिसून येतं. तिने तिच्या जीवनातला चार्म लग्नानंतर रणबीरच्या आयुष्यातही आणला असल्याचं जाणवतं.

दत्तजयंती विशेष- उपवासाच्या आमटीची खास रेसिपी, आंबट- गोड चवीच्या आमटीने फराळाला येईल रंगत

"living life to the fullest" या ओळी तिच्या आयुष्यातल्या या टप्प्याचे अतिशय योग्य वर्णन करणाऱ्या आहेत. कारण ती तिचं वैवाहिक आयुष्य, तिचं आई होणं हे रणबीरच्या सोबतीने पुर्णपणे एन्जॉय करतेय, असं आलियाची बाॅडी लँग्वेज सांगते.  

टॅग्स :रिलेशनशिपरणबीर कपूरआलिया भट