lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

Ananya Pandey Reveals She Once Called Her Boyfriend 50-75 Times, Check Out Why : सतत कॉल, मेसेज करणं जर आपल्याला प्रेम वाटत असेल तर, पुन्हा विचार करा; पार्टनरची होऊ शकते घुसमट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 02:43 PM2024-04-01T14:43:50+5:302024-04-01T14:44:50+5:30

Ananya Pandey Reveals She Once Called Her Boyfriend 50-75 Times, Check Out Why : सतत कॉल, मेसेज करणं जर आपल्याला प्रेम वाटत असेल तर, पुन्हा विचार करा; पार्टनरची होऊ शकते घुसमट..

Ananya Pandey Reveals She Once Called Her Boyfriend 50-75 Times, Check Out Why | एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

रिलेशनशिप (Relationship Tips) जितके सुखकर आनंदायी वाटते, तितकेच अधिक गुंतल्यावर त्यातील बरेच पैलू उलगडतात. सुरुवातीला सर्वच छान वाटतं. मुख्य म्हणजे स्वभाव जाणून घेताना पार्टनरला एकमेकांच्या बऱ्याच गोष्टी कळतात. काही लोक प्रेमात अक्षरशः वेडे होतात किंवा वेड्यासारखं प्रेम करतात. पण वेड्याप्रेमापायी लोक समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातही नकळत ढवळाढवळ करतात (Toxic Relationship). ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. रिलेशनशिपमध्ये पर्सनल स्पेस देणं गरजेचं आहे. जर ती नसेल तर, नात्यात प्रेम असूनही कोंडल्यासारखं वाटतं.

बरेच लोक पार्टनरला सतत मेसेज, कॉल करून त्रास देतात. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा जीव गुदमरतो, आणि प्रेम असूनही प्रेम आटतं आणि नातं संपुष्टात येतं. असाचं काहीसा नात्यातील खुलासा अभिनेत्री अनन्या पांडेनी (Ananya Pandey) मुलाखतीदरम्यान केला आहे. कसं तिने रिलेशनशिपमध्ये पार्टनरला स्पेस दिला नाही, पर्सनल स्पेस न दिल्याने समोरच्या व्यक्तीची कशी घुसमट होते, शिवाय नात्यात असताना पार्टनरला सतत स्टॉक करणं किती चुकीचं आहे, हे तिने सांगितलं आहे(Ananya Pandey Reveals She Once Called Her Boyfriend 50-75 Times, Check Out Why).

'मी एकेकाळी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल केले आहे'

अनन्या पांडे नेहमीच हटके अदाकारीने चर्चेत असते. अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडते. अलीकडेच अनन्या पांडेने नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये हजेरी लावली होती. तिने यात पूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

तुमचा जोडीदार सतत तुमचा मोबाइल तपासतो, मेसेज वाचतो? हे प्रेम - पझेसिव्हनेस की अविश्वास?

पूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना अनन्या म्हणते, 'एकदा मी माझ्या बॉयफ्रेण्डला कॉल केला होता. त्याने माझा कॉल उचलला नाही. यानंतर मी त्याला ५० ते ७५ वेळा सतत कॉल केले असतील. मला नेहमीच समस्यांवर त्वरित उपाय हवे असतात. समोरच्या व्यक्तीला स्पेस द्यायला नाही आवडत, आणि ही खूप वाईट सवय आहे.'

ती पुढे म्हणते, 'मी लगेच मूव्ह ऑन होते. बऱ्याचदा मनासारखी गोष्ट नाही घडली की, मग मी तासंतास रडते, आणि मला अचानक वाटते, मी आता ठीक आहे. त्यामुळे एखाद्याला वारंवार कॉल करणं टाळा. समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसचा विचार करा. कदाचित पार्टनर तुम्हाला वैतागून फोन एरोप्लेन मोडवर ठेऊ शकतो. जे योग्य नाही.'

चुंबन घेतल्यानं वजन कमी होते, संशोधन सांगते किस आणि कॅलरी बर्नचं गणित

अनन्या सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याची चर्चा आहे. ती बऱ्याचदा आदित्यसोबत डिनर डेटवर दिसली आहे. पण तिने हे नातं जाहीरपणे स्वीकारलेलं नाही. 

Web Title: Ananya Pandey Reveals She Once Called Her Boyfriend 50-75 Times, Check Out Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.