बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे आणि विधानांमुळे जास्त चर्चेत असते. नुकत्याच तिने एका मुलाखतीत आजच्या काळातील प्रेम आणि नात्यांबद्दल आपलं मत मांडलं.(Ananya Panday on love) ती म्हणते आजकालचं प्रेम हे पॉपकॉर्नसारखं झालं आहे. सध्याच्या काळाच नात्यांची व्याख्या झपाट्याने बदलत आहे.(modern relationships India) एकेकाळी प्रेम म्हणजे समर्पण, संयम आणि आयुष्यभराची साथ समजले जायचे. पण आता मात्र अनेकांसाठी हा काही काळापुरताचा आनंद. (love and trust in relationships)अनन्या म्हणते सध्याचं प्रेम पॉपकॉर्न सारखं झालं आहे. सुरुवातीला उत्सुकता, आकर्षण आणि मजा असते. पण अगदी काही काळातच नात्यात कंटाळा येतो. नात्यात थोडीशी अडचण आली की त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय सहज घेतला जातो. लिव्ह-इन-रिलेशनशिप, डेटिंग अॅप्स आणि सतत उपलब्ध असल्यामुळे कमिटमेंटचा अर्थ बदलला आहे. कुणीही थांबायला, एकमेकांना समजून घ्यायला आणि जुळवून घ्यायला तयार नाही.
साध्या साडीत 'रॉयल लूक'! तमन्ना भाटियाचे ५ ब्लाऊज डिझाइन्स, कर्वी फिगर- दिसाल सुंदर
पूर्वीच्या काळी प्रेमात गोडवा, संयम आणि एकमेकांसाठी थांबण्याची ओढ होती. आता ती कुठेतरी हरवत चालली आहे. आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीत इन्स्टंट निकाल हवा असतो. जसं १० मिनिटांत तयार होणारे पॉपकॉर्न. चवीने खातो आणि तितक्याच लवकर ते संपून जातं. अगदी तसंच आजच्या पिढीचं प्रेम झालं आहे. हे प्रेम लवकर फुलतं, पण तितक्याच कमी वेळेत ते कोमेजूनही जातं.
कपिल शर्माच्या शोमध्ये अनन्याने याबाबतीत तिचे मत मांडले. हल्ली नात्यात फोन पासवर्ड शेअर करण्यासारख्या शुल्लक गोष्टींवरुन ब्रेकअप होतात. नात्यांमधील एकमेकांवरचा विश्वास कमी होताना दिसत आहे. लिव्ह- इन रिलेशनशिप आणि कॅज्युअल डेटिंगमध्ये तरुण-तरुणी एकमेकांसोबत राहतात पण त्यांच्या भविष्याविषयी कोणतीही स्पष्टता किंवा कमिटमेंट दिली जात नाही. सध्याच्या पिढीला दिलेला शब्द पाळायला आणि आयुष्यभर साथ निभावायला भीती वाटते. आपल्याला हवं तसं मिळालं नाही की ते लगेच नातं तोडून बाहेर पडतात. डेटिंग्समुळे आज जोडीदारांकडे अनेक पर्याय सहज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी यापेक्षा चांगला मिळेल, या दृष्टीने नात्याकडे पाहिलं जातं.
Web Summary : Ananya Panday says today's relationships are like popcorn: exciting at first but quickly losing charm. Commitment is fading as people seek instant gratification and readily give up when facing difficulties, with dating apps increasing available options.
Web Summary : अनन्या पांडे का कहना है कि आजकल के रिश्ते पॉपकॉर्न की तरह हैं: शुरुआत में रोमांचक लेकिन जल्दी ही आकर्षण खो देते हैं। प्रतिबद्धता कम हो रही है क्योंकि लोग तत्काल संतुष्टि चाहते हैं और कठिनाइयों का सामना करने पर आसानी से हार मान लेते हैं, डेटिंग ऐप्स से उपलब्ध विकल्पों में वृद्धि हुई है।