Join us

अमीर खानच्या लेकीनं तिच्या ब्रॉयफ्रेंडसाठी लिहिलेली ऑनलाइन पोस्ट व्हायरल, इरा म्हणते, 2 वर्षे झाले तरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 13:28 IST

Relationship: स्टार कन्या इरा अमीर खान (Ira Amir Khan) हिने तिच्या ब्रॉयफ्रेंडसाठी लिहीलेली पोस्ट सध्या सोशल मिडियावर (social media) चांगलीच गाजते आहे. बघा तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी नेमकं लिहिलंय काय.... 

ठळक मुद्देइराची आणखी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर गाजते आहे. तिच्या आणि नुपूरच्या रिलेशनशिपच्या दुसऱ्या ॲनिव्हर्सरीबाबत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता अमीर खानची लेक इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) हे दोघे कायम चर्चेत असतात. आताही इराने नुपूरसाठी लिहिलेली पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे... इरा ही अमीरची मोठी लेक. मागील २ वर्षांपासून ती आणि नुपूर शिखरे हे दोघे रिलेशनमध्ये आहेत. त्यांनी त्यांचं हे नातं कधीच जगजाहीर केलं असून दोघांनी एकत्र साजरा केलेला ख्रिसमस किंवा इराने साडी नेसल्यावर नुपूरने तिला दिलेली भरभरून दाद, या गोष्टी नेहमीच सोशल मिडियावर चर्चिल्या जातात.

 

आताही इराची आणखी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर गाजते आहे. तिच्या आणि नुपूरच्या रिलेशनशिपच्या दुसऱ्या ॲनिव्हर्सरीबाबत (2nd anniversary of relationship) तिने ही पोस्ट शेअर केली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना ती खूपच इमोशनल झाली असून ती म्हणतेय की ''खरंतर आपल्या या नात्याला दोनच वर्षे झाली आहेत. पण तरीही असं वाटतं की वर्षानुवर्षांपासून आपलं नातं असंच सुरू आहे. खरोखरंच मला जेवढं शक्य आहे, त्यानुसार मी भरभरून प्रेम करते आहे....''. प्रेम व्यक्त करण्याची आणि ते शब्दांत मांडण्याची तिची पद्धत नेटकरींना भारीच आवडली असून ते तिच्यावर पुन्हा एकदा जाम फिदा झाले आहेत..

 

इराची ही इमोशनल पोस्ट वाचून आता नुपूर त्यावर काय प्रतिक्रिया देणार, हा अनेकांसाठी उत्सूकतेचा विषय होताच. त्यानेदेखील तिला तेवढाच भरभरून प्रतिसाद दिला. इरासाठी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करताना नुपूर म्हणाला की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.. आपलं नातं हे असंच होतं फक्त याची जाणीव आपल्याला २ वर्षांपुर्वी झाली.. या दोन्ही लव्हबर्ड्सनी एकमेकांना दिलेली ही प्रेमभरी दाद सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. 

 

 

टॅग्स :रिलेशनशिपसोशल व्हायरलआमिर खानइरा खान