Lokmat Sakhi >Relationship > दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..

दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..

One-sided relationship signs: Signs your partner is cheating: Relationship coach advice: आपण एकतर्फी प्रेमात आहोत हे कसं समजेल जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 14:32 IST2025-05-19T14:31:39+5:302025-05-19T14:32:14+5:30

One-sided relationship signs: Signs your partner is cheating: Relationship coach advice: आपण एकतर्फी प्रेमात आहोत हे कसं समजेल जाणून घेऊया.

8 signs show Are both of you in love or is it just one-sided partner are lying or cheating relationship coach said | दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..

दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..

प्रेम ही जगातली सुंदर भावना असली तरीही प्रेमात असणाऱ्या प्रत्येक प्रेमीयुगुलाला जग आंधळ भासू लागते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.(One-sided relationship signs) जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा पार्टनरसोबत सतत बोलणे, फिरायला जाणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे, गिफ्ट देणे, काळजी घेणे यांसारख्या गोष्टी आपण करत असतो. परंतु, आपण यावेळी देखील काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.(Signs your partner is cheating) आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती आपला वेळ वाया तर घालवत नाहीये ना? (Relationship coach advice)
अनेकदा नाते जुळवण्यासाठी एकजण कष्ट घेत असतो. आपल्या पार्टनरच्या आवडी-निवडीपासून त्याला किंवा तिला कोणत्या गोष्टीचा राग तर येत नाही ना?(Signs of a toxic relationship) या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात ठेवतो. प्रेम एकतर्फी असेल तर ती भावना वेदनेत कधी बदलू लागते हे देखील समजत नाही.(How to know if you're in a one-sided relationship) याचा आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. अशा नात्यामध्ये आपण प्रेमासह आपला स्वाभिमानदेखील गमावू लागतो.(8 warning signs your partner may be cheating) आपण एकतर्फी प्रेमात आहोत हे कसं समजेल जाणून घेऊया. 

लग्नानंतरही आठवडाभर सिंगल! तरुण पिढीमध्ये वाढतोय नवा ट्रेण्ड, Weekend Marriage! संसार शनिवार-रविवार

प्रसिद्ध लेखिका आणि रिलेशनशिप 'कोच जवाल भट्ट' यांनी इंस्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली . या पोस्टमध्ये त्यांना ८ अशा गोष्टी सांगितल्या ज्यामध्ये आपलं नातं एकतर्फी आहे की, अजून काही याविषयी खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया आपल्या नात्याचे गुपित. 

या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका 

1. आपण एखादी गोष्ट सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी समोरच्याला सतत मेसेज किंवा कॉल करत असू आणि हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल तर काळजी घ्या. असं वारंवार होत असेल तर हे एकतर्फी प्रेमाचे लक्षण असू शकते. 

2. सतत भेटण्यासाठी आपणच पुढाकार घेत असू आणि समोरचा व्यक्ती टाळाटाळ करत असेल किंवा भेटण्यासाठी तितका वेळ देत नसेल तर नात्यात दूरावा आला आहे असं समजून घ्यावे. 

3. स्वत:ची चूक कधीही न स्वीकारणे. चूक कोणाचीही असली तरी नेहमी आपणच माफी मागणे याकडे दुर्लक्ष करु नका. सतत महागड्या गोष्टींची डिमांड करणे किंवा पैशांवरुन वाद घालणे अशा गोष्टी होत असतील तर बसून चर्चा करा. 

4. आपण आपल्या आवडी-निवडी, गरजांकडे दुर्लक्ष करुन नात्यात एकट्याने प्रयत्न करत असू. प्रत्येक वेळ नात्यात आपणच समर्पित होत असू तर हे एकतर्फी प्रेमाचे लक्षण आहे. 

5. दिवसाच्या शेवटी आजचा दिवस कसा गेला आहे याविषयी आपणच नेहमी एकट्याने चर्चा करणे. आपण बोलत असताना समोरचा व्यक्ती आपल्याला बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल. तर वेळीच सावरायला हवे. 

6. भविष्याच्या योजना आखताना आपल्यालाही उडवाउडवीची उत्तरे मिळत असतील किंवा ती चर्चा वारंवार पुढे ढकली जात असेल तर एकदा या गोष्टींवर सविस्तर बोलून घ्या. कारण आपण ज्याच्यासोबत भविष्याचा विचार करत असतो तो किंवा ती कदाचित आपल्याला फसवतही असेल. 

7. आपल्या भावनांची किंवा मतांबद्दल समोरच्या व्यक्तीला आदर आहे का? आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा ती व्यक्ती परिस्थिती कशा पद्धतीने हाताळते याकडे ही लक्ष द्या. आपला मुद्दा किती छोटा किंवा मोठा आहे यापेक्षा आपल्या भावनांची समोरची व्यक्ती खिल्ली उडवत नाही ना हे देखील पाहा. 

8. आपण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असू तर नेहमीच भेटण्यासाठी आपण उत्सुक आहोत का? समोरच्यासाठी सतत सरप्राईज प्लान करणे यासगळ्या गोष्टी वारंवार होत असतील तर आपण एकतर्फी प्रेमात आहोत हे समजून घ्यावे. 

 

Web Title: 8 signs show Are both of you in love or is it just one-sided partner are lying or cheating relationship coach said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.