नातं म्हणजे प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाच अनोख बंधन. प्रत्येक नातं सुखकारक असावं यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.(things couples should never share) अनेकदा नात्यात विनाकारण वाद होत असतात.(marriage privacy tips) पण प्रश्न असा पडतो की, मी समोरच्याला काही चुकीच बोलले का? पण कधीकधी चुकीच्या वेळी काही गोष्टी बोलल्याने वाद निर्माण होतात.(relationship advice for couples) कधी कधी कळत नकळतपणे अशा गोष्टी करतो ज्यामुळे आपलं नातं कमकुवत होतं. वैयक्तिक गोष्टी शेअर केल्याने नात्यात दुरावा येतो. (how to keep your marriage strong)
अनेकदा भांडण झाल्यानंतर आपण जोडीदाराशी बोलण्याऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तीला आपलं मत सांगतो. आपण त्याचा सल्ला ऐकून पार्टनरसोबत अबोला धरतो, ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो.(what not to share in a relationship) इतकेच नाही तर जोडीदाराने या ५ गोष्टी कोणालाही शेअर करु नका. ज्यामुळे नात्यातील अंतर वाढत जाईल. (secrets to a happy married life)
कंडोमला एक्सपायरी डेट असते का? होऊ शकतात हे गंभीर आजार, किती दिवसांत वापरायला हवं- जाणून घ्या
1. जर आपण पालक असू तर नातेसंबंधात मतभेद होणं सामान्य आहे. इतरांसमोर आपल्या जोडीदाराच्या निर्णयांवर टीका केल्याने नातं कमकुवत होते.ज्याच्यामुळे मुलांवर देखील नकारात्मक परिणाम होतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेहमी शांतपणे चर्चा करा.
2. आपण अनेकदा जोडीदाराच्या चुका जवळच्यांसमोर किंवा नातेवाईकांसमोर बोलतो. ज्यामुळे ते त्यांच्या दृष्टीकोनातून आपल्याला सल्ला देतात. याच्यामुळे आपल्या जोडीदाराचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. विनोद करताना किंवा एखादी गोष्ट बोलताना जोडीदाराचा आदर राखायला हवा.
3. नवरा-बायकोमध्ये अनेकदा वाद होतात. आर्थिक अडचणी तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केल्याने जोडीदाराला लाज वाटू शकते किंवा अस्वस्थ वाटू शकते. अनेकदा जवळची माणसं अनावश्यक सल्ला देतात किंवा हस्तक्षेप करतात.
4. पती- पत्नीमध्ये कधीकधी वाद होणे सामान्य आहे. पण हा वाद इतरांसोबत शेअर करणे चांगली कल्पना नाही. यामुळे लोक तुमच्या नात्याबद्दल टीका करतात. कधीकधी इतरांच्या हस्तक्षेपामुळे ही परिस्थिती आणखी खराब होते. परस्पर चर्चा करुन वाद सोडवा.
5. आपल्या जोडीदाराशी तुलना कधीही इतरांशी करु नका. तुलना केल्याने अंतर वाढते. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे वेगळे गुण असतात. आणि त्यांना जसं आहे तसं स्वीकारणे हे खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे.