Lokmat Sakhi >Relationship > ब्रेकअप झालं, किती काळ रडत बसणार ? ५ उपाय, आयुष्य नव्यानं सुरू करा - व्हा मुव्ह ऑन !

ब्रेकअप झालं, किती काळ रडत बसणार ? ५ उपाय, आयुष्य नव्यानं सुरू करा - व्हा मुव्ह ऑन !

What is the best way to move on after a breakup : How To Move Forward After a Breakup : ब्रेकअप झाल्यावर त्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 10:58 PM2024-06-15T22:58:16+5:302024-06-15T23:19:14+5:30

What is the best way to move on after a breakup : How To Move Forward After a Breakup : ब्रेकअप झाल्यावर त्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ते पाहूयात...

5 helpful tips for moving on after a breakup and start healing How to move on after a breakup | ब्रेकअप झालं, किती काळ रडत बसणार ? ५ उपाय, आयुष्य नव्यानं सुरू करा - व्हा मुव्ह ऑन !

ब्रेकअप झालं, किती काळ रडत बसणार ? ५ उपाय, आयुष्य नव्यानं सुरू करा - व्हा मुव्ह ऑन !

आजच्या काळात ब्रेकअप होणं ही एक कॉमन गोष्ट मानली जाते. सध्याचा काळ इतका बदलला आहे की, अगदी छोट्या - छोट्या कारणांवरूनही ब्रेकअप केले जाते. हल्ली ब्रेकअप हा एक प्रकारचा ट्रेंड झालाय असं म्हणायला हरकत नाही. 'ब्रेकअप झालंय' हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच ते अनुभवणं कठीण आहे. ज्या व्यक्तीला ब्रेकअपला सामोरे जावे लागते त्याची अवस्था काय असेल ते खरंतर त्याच्याशिवाय दुसर कोणीच समजू शकत नाही. ब्रेकअपनंतर बऱ्याचदा सर्वकाही निरर्थक वाटू लागतं. एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत बराच काळ घालवला असेल आणि अचानक नात्यात दुरावा येऊ लागला तर सहन करणे शक्य होत नाही(How to move on after a breakup).

ब्रेकअप झाल्यावर आपलं दुःख इतकं वाढत की, दिवस - रात्र आपण उपाशी राहतो. रडून रडून स्वतःला खूप त्रास करुन घेतो. अशावेळी नात्यातून वेगळं होणं थोडं कठीण जात. ब्रेकअप नंतर आपल्या मनात एकाचवेळी दु:ख, राग, अपराधीपणा, चिंता अशा अनेक भावना येऊ शकतात. याचबरोबर ब्रेकअप झाल्यावर यातून बाहेर कसं पडायचं ? हे देखील तितकेच महत्वाचे असते. ब्रेकअप झाल्यावर त्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ते पाहूयात(What is the best way to move on after a breakup).

ब्रेकअप झाल्यावर स्वतःला कसं सावराव ?

१. सत्य परिस्थिती स्वीकारा :- ब्रेकअपनंतर सत्य परिस्थिती आपण जेवढ्या लवकर स्विकारू तेवढेच आपल्याला सोपे जाते. ब्रेकअपनंतर अनेकजण हे स्वीकारायला तयार नसतात की त्यांचा पार्टनर त्यांना सोडून गेला आहे. यामुळेच मग ते जुन्या आठवणींमध्ये अडकून राहतात. त्यामुळे नाते संपल्यानंतर आता हे नाते संपले आहे हे मनापासून स्वीकारा आणि मुव्ह ऑन करा. 

२. मित्र - मैत्रिणी, नातेवाईकांसोबत वेळ घालवा :- ब्रेकअपनंतर एकटे राहणे शक्यतो टाळा. आपले मित्र - मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत वेळ घालवा आणि  भरपूर आनंद घ्या. त्याचबरोबर मित्र - मैत्रिणींचा आधार घ्यावा. आपल्याला येणाऱ्या भावनांबद्दल बोलणे तसेच एकटेपणाची जाणीव होऊ न देणे यांसाठी त्यांची मदत होऊ शकते.

३. भविष्याचा विचार करा :- नात संपल म्हणून सर्वकाही संपत नाही हे आपण स्वतःला समजावून सांगितले पाहिजे. ब्रेकअपनंतर, स्वतःला बंद खोलीत कोंडून घेण्यापेक्षा घराबाहेर जाणे, नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करणे आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. भविष्याकडे सकारात्मकतेने पाहा. आपल्या जीवनासाठी नवीन ध्येय आणि योजना तयार करा.आत्म -सुधारणेवर लक्ष केंद्रित करा. 

४. स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्वाचे :- एखाद्यासोबत नात्यात राहिल्याने आपण परावलंबी होतो आणि म्हणूनच ब्रेकअपनंतर आपण आपल्या जोडीदाराशिवाय जगू शकत नाही आणि त्याला मिस करत राहतो. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम आपण स्वतःच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, म्हणून आपले महत्त्व समजून घ्या. याचबरोबर शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घ्या. चांगले खाणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी विश्रांती करण्यावर जास्त भर द्यावा. आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ घालवा आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आपला आवडता छंद जोपासा.

५. आवडीच्या ठिकाणी फिरायला जा :- निसर्गाच्या सानिध्यात भटकंतीचा प्लॅन आपल्याला ब्रेकअमधून सावरण्याठी उपयुक्त ठरू शकतो. ब्रेकअपनंतर  आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे हा चांगला पर्याय असू शकतो. यामुळे आपण तिथल्या हवामानाच्या सौंदर्यात हरवून जाल आणि भूतकाळ विसरायला थोडी  मदत होईल, त्याचबरोबर भविष्याचा विचार करायलाही वेळ मिळेल.

ब्रेकअप वेदनादायक असू शकतात, परंतु ते आपल्याला आत्म - शोधाची संधी देखील देऊ शकतात. आपल्याला पुढे येणाऱ्या नात्यात काय हवे आहे याबद्दल सुद्धा आपल्याला ब्रेकअपमुळेच स्पष्टता येते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हे आपल्याला भविष्यात अधिक परिपूर्ण आणि समाधानकारक नात्याकडे नेऊ शकते.

Web Title: 5 helpful tips for moving on after a breakup and start healing How to move on after a breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.