Join us

प्रेमात आहात पण सतत भांडणं-रागराग-चिडचिड? ४ उपाय, नात्यातले प्रेम वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 13:21 IST

Relationship Tips: How to keep your partner cool: partner always gets angry: 4 way to handle angry partner: relationship distance: What to do when your partner is constantly angry: Is Your Partner Always Upset: How to deal with an angry wife: जोडीदार सतत छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करतो मग ४ उपाय करा...

सध्या वाढत्या कामाच्या ताणामुळे आपण आरोग्यासह नातेसंबंधांकडे देखील दुर्लक्ष करतो. कामाचा वाढता ताण हा फक्त शरीरालाच नाही तर मनावर देखील परिणाम करतो.(How to keep your partner cool) ज्यामुळे आपली मानसिक स्थिती खराब होते. कामाचा राग आपल्याला काढायला मिळाला नाही तर आपण तो घरच्यांवर काढतो किंवा जोडीदारावर. याचा थेट परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होतो. (4 way to handle angry partner)तुमचा जोडीदार सतत छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रागराग चिडचिड करत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेच आहे. (Is Your Partner Always Upset)यामुळे नातं बहरण्याऐवजी ते तुटण्याची शक्यता अधिक जास्त असते. यासाठी आपण काही सोप्या टिप्स फॉलो करु शकतो ज्यामुळे जोडीदाराचा राग शांत होईल आणि नातं नव्यासारखं पुन्हा बहरेल. 

अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

1. काही लोकांना छोट्या - छोट्या गोष्टीवरुन भावनिक होण्याची सवय असते. त्यांच्या या सवयींमुळे जोडीदार लगेच नाराज होतो. अनेकदा मस्तीमध्ये म्हटलेल्या शब्दांमुळे देखील मन दुखावलं जातं. अशावेळी आपल्याला गरजेपेक्षा जास्त भावनिक होणं टाळायला हवं. असं करणं देखील जोडीदाराच्या रागाच कारण असू शकतो. आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त करणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. 

2. जर आपला पार्टनर काही कारणांमुळे रागवला असेल तर त्याला वारंवार त्याच गोष्टींवर प्रश्न विचारु नका. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारण्यापूर्वी त्याचा राग शांत होण्याची वाट पाहा. जोडीदार रागवला असेल तर तो योग्य उत्तर देणार नाही. उलट सतत प्रश्न विचारल्याने त्याचा राग अजून वाढेल. 

वयाची तिशी ओलांडली म्हणून लग्न जमवण्याची घाई करताय? तरीही जोडीदार निवडताना ५ चुका नकोच

3. जोडीदार रागवल्यामुळे आपण त्याच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळं राग शांत होण्याऐवजी तो अधिक प्रमाणात वाढतो. जेव्हा आपला जोडीदार रागवतो तेव्हा त्याचे काळजीपूर्वक ऐका. त्याच्या आवडी-निवडीवर अधिक लक्ष द्या. अशावेळी संवाद साधणं फार महत्त्वाचं असतं. 

4. अनेकदा रागामध्ये आपण जुनी भांडणं उकरुन काढतो. त्यामुळे राग कमी होण्याऐवजी तो अधिकच वाढतो. नात्यात एकमेकांना दोष देण्यापेक्षा संवाद साधून जोडीदाराच राग कसा निवळेल याचा विचार करा. रागाच्या वेळी उगात जुने विषय काढू नका.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप