उन्हाळ्यात रोज ताक का प्यायला हवं? ७ कारणं, दुपारी न चुकता १ ग्लास ताक प्या
Updated:March 27, 2026 15:00 IST2026-03-27T13:07:05+5:302026-03-27T15:00:57+5:30
Why should we drink buttermilk every day in summer : ताकामध्ये व्हिटामीन बी-१२, कॅल्शियम आमि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात दररोज ताक प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला गारवा देण्यासाठी आणि ताजंतवानं ठेवण्यासाठी ताक हे नैसर्गिक पेय मानले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरील अमृत असे म्हटले आहे. (Why should we drink buttermilk every day in summer)
शरीराला गारवा मिळतो
ताकाचा प्रभाव हा नैसर्गिकरित्या थंड असतो. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी जळजळ कमी करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक अत्यंत प्रभावी ठरते. (7 Benefits Of Drinking Buttermilk)
ताकानं पचनसंस्था सुधारते
ताकात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात हे बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात गॅस किंवा एसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक पिणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.
डिहायड्रेशनपासून बचाव होतो
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी आणि मीठ बाहेर पडते. ताकात पाणी, मीठ आणि पोषक घटक असतात जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यात आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ताकात कॅलरीज आणि फॅट्स खूपच कमी असतता. जेवल्यानंतर ताक प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे अवेळी लागणआरी भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
इम्यूनिटी वाढते
ताकामध्ये व्हिटामीन बी-१२, कॅल्शियम आमि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात दररोज ताक प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ज्यामुळे उन्हाळ्यातील संसर्गापासून संरक्षण होते.
हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
दूध किंवा दह्याप्रमाणेच ताक हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. हाडांची मजबूत वाढवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी ताक उपयुक्त ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर
ताकामध्ये लॅक्टिक एसिड असते जे त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंजरचे काम करते. नियमित ताक प्यायल्यानं त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.