वजन कमी करा खा खास कोशिंबीर! दररोज फक्त १ वाटी खाऊनही घटेल वजन झरझर, पाहा रेसिपी...
Updated:February 25, 2026 20:00 IST2026-02-25T20:00:00+5:302026-02-25T20:00:02+5:30
Vajan kami karnyachi koshimbir recipe : Indian Weight Loss Salad Recipes : झटपट वेटलॉस करण्यासाठी कोशिंबीर रेसिपी, चवीला भारी आणि करायला सोप्या...

Indian Weight Loss Salad Recipes
वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा 'काय खावे' यापेक्षा 'काय खाऊ नये' यावर जास्त लक्ष देतो. पण याउलट, जर आपल्या नेहेमीच्या आहारात योग्य प्रमाणात फायबर आणि पोषक तत्वे असतील तर पोटभर खाऊनही वजन कमी करणे सहज शक्य असते. 'कोशिंबीर' हा असाच एक पदार्थ आहे जो केवळ पचन सुधारत नाही, तर शरीराला हायड्रेटेड ठेवून वाढलेली (Vajan kami karnyachi koshimbir recipe) चरबी कमी करण्यास मदत करतो.
वजन कमी करण्यासाठी कोशिंबीर खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. वेटलॉस करण्यासाठी जर आपण (Indian Weight Loss Salad Recipes) कोशिंबीरीमध्ये योग्य पदार्थांचा वापर केला, तर ते एक उत्तम 'सुपरफूड' ठरू शकते.
१. मिक्स व्हेज कोशिंबीर (Mix Veg Salad) :-
काकडी, गाजर, टोमॅटो, बीट आणि कोथिंबीर इतकेच साहित्य लागते किंवा (Indian Weight Loss Salad Recipes) आपण आपल्या आवडीनुसार इतर भाज्यांचा देखील समावेश करू शकता. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. त्यात वरुन चवीनुसार थोडा लिंबू पिळा आणि सैंधव मीठ भुरभुरवून घाला. यात फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि फूड क्रेविंग्स देखील होत नाही परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
२. मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर (Sprouted Salad) :-
वजन कमी करण्यासाठीची कोशिंबीर करण्यासाठी मोड आलेली मूग किंवा मटकी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. कडधान्ये हलकी वाफवून घ्या. त्यात भाजलेले मेथी दाणे किंवा अळशीच्या बियांची पूड टाकल्यास अधिक फायदा होतो. प्रोटीन्सचा उत्तम स्रोत असून स्नायू बळकट करण्यास मदत करतो.
३. काकडी आणि दह्याची कोशिंबीर (Cucumber Raita) :-
वेटलॉस कारण्यासाठी काकडी - दह्याची थंडगार, चविष्ट कोशिंबीर खाणं (Indian Weight Loss Salad Recipes) फायद्यांचं ठरते. किसलेली काकडी, ताजे दही, जिरे पूड इतकेच साहित्य लागते. दह्यात काकडी आणि जिरे पूड मिसळा. साखर टाळणे वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते. ही कोशिंबीर वजन कमी करण्यासोबतच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालते.
४. अळशी आणि फळांची कोशिंबीर (Flaxseed & Fruit Salad) :-
वजन कमी करण्यासाठी कोशिंबीर या प्रकारातील सर्वात चविष्ट आणि खायला सगळ्यांनाचं आवडणारी अशी अळशी आणि फळांची कोशिंबीर. ही कोशिंबीर करण्यासाठी आपल्या आवडीनुसार फळे घेतली तरी चालतील. सफरचंद, पपई आणि १ चमचा भाजलेली अळशी इतकं साहित्य पुरेसं आहे. फळे कापून त्यावर अळशीची पूड भुरभुरा. अळशीतील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.
५. बीट आणि शेंगदाणा कोशिंबीर (Beetroot & Peanut Salad) :-
वजन कमी करण्यासाठीची कोशिंबीर करण्यासाठी किसलेले बीट, भाजलेले शेंगदाणे (कूट किंवा अख्खे), आणि जिरे पूड हे साहित्य लागेल. बीटाचा किस बाऊलयामध्ये घेऊन त्यात भाजलेले शेंगदाणे आणि जिरे पूड मिसळा. बीट रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि शेंगदाण्यातील 'गुड फॅट्स' शरीराला इन्स्टंट ऊर्जा देतात.
६. पनीर आणि काकडीची कोशिंबीर (Paneer & Cucumber Salad) :-
कमी फॅट असलेले पनीरचे तुकडे, काकडी, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस. पनीरचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. त्यात चिरलेली काकडी आणि मिरची मिसळा. वरून लिंबू पिळा. पनीरमुळे शरीराला प्रोटीन मिळतात, ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही, परिणामी अनावश्यक खाणं टाळून वजन कमी करण्यासाठी कोशिंबीर खाणं फायद्याच ठरतं.
७. हरभरा आणि गाजर कोशिंबीर (Chickpea & Carrot Salad) :-
उकडलेले काळे हरभरे, किसलेले गाजर, कोथिंबीर आणि चाट मसाला. उकडलेल्या हरभऱ्यात किसलेले गाजर आणि कोथिंबीर घाला. चवीसाठी थोडा चाट मसाला भुरभुरवून घाला. हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे वजन कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करते.