1 / 7दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिचा लूक पाहून चाहत्यांसह अनेकांना ती ओळखताच आली नाही. (Samantha Ruth Prabhu new look viral)2 / 7तिच्या ड्रेसने साऱ्यांचे लक्ष तर वेधले पण अचानक झालेल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तिची स्टेजवर एन्ट्री झाली आणि ही समंथा नाही असंच अनेकांना वाटलं. (Samantha Prabhu health update)3 / 7तिला पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटली. समंथा नेमके काय झालंय, इतकी बारीक का झाली? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. बॉडीकॉन ड्रेसमुळे ती खूपच बारीक आणि नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. (Samantha Ruth Prabhu weight loss reason)4 / 7समंथाला मायोसिटीस ऑटोइम्युन आजार झाला होता. यावेळी तिने उपचार घेताना कामातूनही ब्रेक घेतला होता. या आजारामुळे तिचे वजन वाढत नाहीये असं तिने म्हटलं होतं.5 / 7या आजारात शरीराचे स्नायू कमकुवत होतात, सतत वेदना आणि थकवा येतो. ज्यामुळे वजन वाढण्याऐवजी ते कमी होते. 6 / 7समंथाने सांगितले होते की, या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती काही दाहक- विरोधी आहार घेते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते, ज्यामुळे तिचे वजन कमी होत आहे. 7 / 7तिच्या आहारात अनेकदा प्लांट बेस फूड, फळे, काजू, ओट्स यांचा समावेश असतो. तसेच ती व्यायाम आणि योगा देखील करते.