महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा? काय खावे-काय खाऊ नये-पाहा आरोग्यासाठी काय चांगले..
Updated:February 13, 2026 14:11 IST2026-02-13T13:39:39+5:302026-02-13T14:11:31+5:30
Mahashivratri 2026 Vrat Do's and Dont's For Your Fasting: उपवासाच्या पदार्थांमध्ये साध्या मिठाऐवजी नेहमी सैंधव मिठाचा वापर करा.

Mahashivratri 2026 Vrat Rules
महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2026) उपवास हा श्रद्धेचा आणि शिस्तीचा भाग आहे. या दिवशी काय खावे आणि काय टाळावे ते समजू घेऊ. ज्यामुळे उपवासाचा त्रास होणार नाही आणि आहारात योग्य पदार्थांचा तुम्ही समावेशही करू शकता. ( Mahashivratri Vrat What to Eat And What To Avoid)
फळं खा
महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही चिकू, पेरू यांसारखी ताजी फळं खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर आणि ऊर्जा मिळते. (Mahashivratri Vrat Dos and Dont's For Your Fast)
दुधाचे पदार्थ
दूध, दही , ताक, लोणी आणि पनीर यांचा समावेश आहारात करा. यामुळे ऊर्जा टिकून राहते.
साबुदाण्याचे पदार्थ
साबुदाणा खिचडी किंवा वडे हा लोकप्रिय फराळ आहे. मात्र पित्ताचा त्रास असल्यास साबुदाणा मर्यादित प्रमाणातच खावा.
रताळे किंवा बटाटे
उकडलेली रताळी किंवा बटाट्याची भाजी खाल्ल्यानं पोट बराचवेळ भरलेलं राहतं.
सैंधव मीठ
उपवासाच्या पदार्थांमध्ये साध्या मिठाऐवजी नेहमी सैंधव मिठाचा वापर करा.
सुका मेवा
बदाम, अक्रोड आणि खारीक यांसारखा सुका मेवा खाल्ल्यानं उपवासात येणारा थकवा दूर होतो.
काय टाळावं?
जर तुम्ही उपवास करणार असाल तर तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यांचे सेवन पूर्णपणे टाळावे.
सोसेल तसा तब्येत सांभाळून उपवास करावा, उपासना महत्वाची हे लक्षात ठेवावं.