साधा गहू आणि खपली गहू यात काय फरक असतो? शुगर असेल तर खरंच खपली गहू खावा का?
Updated:February 3, 2026 19:35 IST2026-02-03T12:12:12+5:302026-02-03T19:35:15+5:30
Khapli Wheat Chapati Benefits : खपली गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखर वेगानं वाढत नाही. याऊलट साध्या गव्हाच्या इंडेक्स तुलनेनं जास्त असतो.

खपली गहू आणि साधा गहू दिसायला सारखे वाटत असले तरी त्याचे गुणधर्म आणि आरोग्यासाठी होणारे फायदे यात मोठा फरक असतो. (Khapli Wheat Chapati Benefits)
खपली गहू हा साध्या गव्हाच्या तुलनेत अधिक पौष्टीक असते. यात फायबर्स, खनिजं आणि जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात.
खपली गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखर वेगानं वाढत नाही. याऊलट साध्या गव्हाच्या इंडेक्स तुलनेनं जास्त असतो.
साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खपली गहू हा डायबिटीसच्या रुग्णांसाठी वरदान मानला जातो. तर साधा गहू अतिप्रमाणात खाणं मधुमेहात टाळलं जातं.
खपली गहू पचायला हलका असतो आणि यातील फायबर्समुळे पोटाचे विकार कमी होतात. साध्या गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्यानं काहींना तो पचायला जड वाटतो.
साध्या गव्हात ग्लुटेन जास्त असते. ज्यामुळे पोळ्या मऊ होतात. खपली गव्हात नैसर्गिक ग्लुटेन कमी असल्यामुळे त्याची पोळी थोडी कडक किंवा जाडसर होऊ शकते.
खपली गव्हाचा दाणा लांबट आणि कडक असतो. तर साध्या गव्हाचे दाणे गोलसर आणि मऊ असतात. खपली गव्हाची चव थोडी वेगळी आणि चविष्ट असते.
खपली गव्हाचे सेवन रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. जे साध्या गव्हाच्या बाबतीत तितकेसे प्रभावी नसते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर खपली गहू खाणं हा उत्तम पर्याय आहे.