उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

Updated:April 5, 2025 18:00 IST2025-04-05T11:11:57+5:302025-04-05T18:00:56+5:30

Weight Loss Tips In Summer : तुम्ही सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टी काही फार अवघड नाहीत.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

वजन कमी करणं ही अलिकडे एक गंभीर समस्या बनली आहे. कारण जास्तीत जास्त लोक अनेक प्रयत्न करूनही आपलं वजन कमी करू शकत नाहीत. याची कारणं वेगवेगळी असतात. तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचे अनेक प्रयत्न करून थकले असाल तर निराश होण्याची गरज नाही. वजन कमी करण्यासाठी काही ठराविक महिना किंवा वेळाची गरज नसते. तुम्ही सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टी काही फार अवघड नाहीत.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

वजन कमी करण्यासाठी उन्हाळा खूप फायदेशीर मानला जातो. कारण या दिवसांमध्ये लोक पाणी खूप पितात. ज्यामुळे शरीरात कॅलरी कमी जातात आणि फॅटही बर्न होतं. इतकंच नाही तर या दिवसांमध्ये जेवणही कमी जातं. अशात आहारात इतर काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

उन्हाळ्यात जेवण करताना सलाग खाणं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. गरमीच्या दिवसात काकडी, गाजर, टोमॅटो यांचं सॅलड पोषण देण्यासोबतच पाण्याची कमतरताही भरून काढतं. सॅलड खाल्ल्यानं तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही फास्ट फूडपासून लांब राहाल.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

दही आणि ताक या दिवसात भरपूर प्यावं. याचे अनेक फायदे आहेत. यानं शरीराचं वाढलेलं तापमान कमी होण्यास मदत होईल आणि तुमचं वजनही कमी होईल. तसेच यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहील. ज्यामुळे जास्तीचं खाणं टाळता येईल.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

हलक्या भाज्यांचं सेवन करा. या दिवसात लौकी, गिलके यांसारख्या भाज्या फायदेशीर असतात. या तुमचं वजन कंट्रोल करतात आणि सोबतच पचनक्रियाही चांगली राहाते.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

उन्हाळ्यात खरबूज आणि कलिंगड खाणे सुद्धा अधिक फायद्याचं ठरतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. कारण यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आंब्यांपासून लांबच राहिलेलं बरं.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणं अनेकांना आवडतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की हे वजन कमी करण्यासही मदत करतं. लिंबू पाण्यानं शरीर हायड्रेट राहत आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात वेगवेगळे थंड पेय पितात. फळांचे ज्यूस, लिंबू सोडा इतरही अनेक साखर असलेले ज्यूस पितात. पण हे ज्यूस किंवा पेय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. यातील शुगरनं लठ्ठपणा वाढतो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असे ज्यूस पिणं टाळावं.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करणं फायदेशीर ठरेल? पाहा ही युक्ती

वजन कमी कऱण्यासाठी इतर गोष्टींसोबतच वॉक करणं खूप महत्वाचं ठरतं. उन्हाळ्यात सकाळी 5 ते 6 वाजता दरम्यान वॉक करणं फायदेशीर राहील. यानं वजन तर कमी होईलच सोबतच शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील. जेवण झाल्यावर काही वेळ पायी चालण अजिबात विसरू नका.