कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

Updated:September 26, 2025 09:40 IST2025-09-26T09:37:38+5:302025-09-26T09:40:02+5:30

कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

चिप्स, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स हे पदार्थ एवढे चवदार असतात की कोणालाही ते खाण्याचा मोह होतोच..पटकन एखादं चॉकलेट तोंडात टाकावं वाटतं किंवा मग चिप्सचं पाकिट घेऊन खावंसं वाटतं.(how to stops chocolate, chips and coldrinks cravings?)

कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

असं जर तुमच्याबाबतीत सतत होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. त्या पदार्थांना थोडे वेगळे पर्याय शोधा. ते पर्याय नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

जर तुम्हाला खूप चिप्स खावे वाटत असतील तर त्याच्याऐवजी वेगवेगळ्या फ्लेवरचे खाकरे खाऊन पाहा. खाकऱ्यांमध्ये ऑईल कंट्रोल, ऑईल फ्री असे कित्येक प्रकार मिळतात. त्यामधले काही फ्लेवर ट्राय करून पाहा.

कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खाण्यास प्राधान्य द्या. डार्क चॉकलेट खाण्याचे कित्येक फायदेही आहेत. पण डार्क चॉकलेटमधेही योग्य पद्धतीच्या चॉकलेटची निवड करा.

कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी लिंबू सरबत, जिरा सोडा, ताक, कोकम असे वेगवेगळे सरबत पिण्यास प्राधान्य द्या. एखाद्या पदार्थामध्ये कधीतरी सोडा घालून तुम्ही कोल्ड्रिंक्सचा फिल आणू शकता.