वाढत्या वजनांमुळे हैराण? गव्हाच्या पिठात कालवा ५ पदार्थ, महिनाभरात वजन होईल झरझर कमी
Updated:October 9, 2025 18:06 IST2025-10-09T17:44:17+5:302025-10-09T18:06:18+5:30
wheat flour for weight loss: how to lose weight naturally: healthy atta mix for weight loss: ही पौष्टिक चपाती खाल्ल्यावर महिन्याभरात ८ ते १० किलो वजन कमी होईल.

वजन वाढू लागले की, आपल्यापैकी अनेक डाएटिंगचा विचार करतात. अनेकांना असं वाटतं की, डाएटिंगमध्ये खाणं-पिणं बंद करणं आणि उपाशी राहणं. पण असं केल्याने वजन कमी होण्याऐवजी आपल्याला अशक्तपणा येतो.(wheat flour for weight loss)
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कार्ब्स असणे आवश्यक आहे. प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. शिखा शर्मा म्हणतात आपण रोज खाणाऱ्या चपातीत काही गोष्टी मिसळल्या तर आपले वजनही कमी होईल आणि शरीराला भरपूर पोषणही मिळेल. इतकेच नाही तर महिन्याभरात आपले वजन ८ ते १० किलो कमी होईल.(how to lose weight naturally)
गव्हाच्या पीठामध्ये बेसन मिसळायला हवं. बेसनात प्रथिने, फायबर, खनिजे आणि इतर पोषक तत्व असतात. यात कार्बोहायड्रेट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. ज्यामुळे आपले वजन सहज कमी होते.
गव्हाच्या पीठात अळशीचा पावडर मिक्स करुन त्याच्या चपात्या बनवा. यात असणारे ओमेगा- ३ फॅटी अॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. भरपूर फायबर असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
तीळ भाजून त्याची पावडर करा आणि गव्हाच्या पीठात कालवा. यात असणारे फायबर पोट जास्त काळ भरण्यास मदत करेल. तसेच कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या आरोग्याला, केसांना आणि त्वचेला चांगला फायदा होतो.
गव्हाच्या पीठात ओवा घातल्याने आपले पचन सुधारते, चयापचय वाढतो. ओवा भाजून त्याची पावडर करुन पिठात घालून चपाती बनवा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.