ना व्यायाम -ना डाएट, तरी वजन झरझर कमी होऊन ३० दिवसांत दिसाल फिट, पाहा कसे?
Updated:April 11, 2026 16:45 IST2026-04-11T16:39:40+5:302026-04-11T16:45:34+5:30

वाढत्या वजनाची, तब्येतीची चिंता वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय दररोज अगदी नियमितपणे करून पाहा. काही दिवसांतच खूप चांगला फरक जाणवू लागेल.
हा उपाय आपल्याला नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अशा तिन्ही खाण्यानंतर करायचा आहे. आणि त्यासाठी प्रत्येकी १०- १०- १० मिनिटांचा वेळ द्यायचा आहे.
त्यावेळेत मध्यम गतीने वॉकिंग करायचं आहे. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अशा प्रत्येक जेवणानंतर जर तुम्ही १० मिनिटे चाललात तर वजन तर कमी होईलच पण आरोग्याला खूप फायदेही होतील.
बऱ्याच लोकांना नेहमीच अपचन, ब्लोटिंग, गॅसेस, ॲसिडीटी असे त्रास होतात. हे त्रास कमी करण्यासाठीही प्रत्येक जेवणानंतर वॉकिंग करणे खूप फायदेशीर ठरते.
जेवणानंतर रक्तातली साखर वाढते. हे टाळण्यासाठीही जेवणानंतर केलेलं वॉकिंग खूप फायदेशीर ठरतं. मधुमेही लोकांना तर याचा विशेष फायदा होतो.
काही लोकांना दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती, आळस येतो. काम करण्याचा मूड नसतो. अशा लोकांसाठीही वॉकिंग खूप फायदेशीर ठरते. कॅलरी बर्न होतात. त्यामुळे दिवसभर आपण ॲक्टीव्ह, फ्रेश राहातो.