Join us   

वजन कमी करण्यासाठी हे पाहा कोरफडीचे ५ जबरदस्त फायदे, कोरफडीसारखा असरदार इलाज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 5:26 PM

1 / 11
केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यसाठी कोरफड जशी महत्त्वाची ठरते, तशीच ती खूप आरोग्यदायी आहे.
2 / 11
वजन कमी करण्यासाठीही कोरफडीचा खूप फायदा होतो. आहारतज्ज्ञ रिषिका मितू यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना कोरफडीच्या नियमित सेवनामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, याची माहिती दिली आहे.
3 / 11
कोरफडीमुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया या दोन्हीला चांगला वेग येतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण कमी होत जाते.
4 / 11
कोरफडीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वारंवार भूक लागत नाही.
5 / 11
शरीरात पाणी खूप साचून राहत असेल तरीही शरीरावर सूज येते आणि वजन वाढलेले वाटते. अशापद्धतीची शरीरावरची सूज कमी करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते.
6 / 11
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही कोरफडीची मदत होते.
7 / 11
हे सगळे फायदे करून घ्यायचे असतील आणि वजन कमी करायचे असेल तर जेवणाच्या १४ ते १५ मिनिटे आधी कोरफडीचा ज्यूस प्यावा. त्यामुळे खूप लवकर वजन कमी होईल, असे आहातज्ज्ञ सांगतात.
8 / 11
कोरफडीचा ज्यूस नुसता प्यायला जात नसेल तर एखाद्या भाजीच्या किंवा फळाच्या ज्यूसमध्ये टाकून प्यावा.
9 / 11
सकाळी रिकाम्यापोटी १ ग्लास कोमट पाण्यात एखादा चमचा कोरफडीचा ज्यूस टाकून प्यावा.
10 / 11
कोरफडीचा गर आणि मध एकत्र करूनही तुम्ही कोरफडीचे सेवन करू शकता.
11 / 11
तसेच कोरफडीचा गर आणि लिंबूपाणी असं एकत्र करून प्यायलं तरी चालतं. वरीलपैकी जी पद्धत तुम्हाला आवडेल त्यापद्धतीने काही दिवस कोरफडीचा गर सेवन करून पाहा. वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्स