झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

Updated:July 26, 2025 17:00 IST2025-07-26T16:25:01+5:302025-07-26T17:00:24+5:30

ayurvedic tips to lose weight : natural weight loss with Ayurveda : ayurvedic remedies for weight loss : how to reduce weight naturally : weight loss tips based on Ayurveda : वेटलॉससाठी अशा कोणत्या ५ सवयी आहेत ज्या फॉलो केल्यास वजन झटपट कमी होण्यास मदत होते ते पाहा...

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

शरीरातील अतिरिक्त वाढलेली चरबी अनेक त्रासदायक (weight loss tips based on Ayurveda) ठरू शकते. यामुळे चालणे, बसणे, उठणे अशा दैनंदिन क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. याशिवाय नीट झोप न लागणे, डिप्रेशन, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

वजन कमी करायचं असेल, तर फक्त डाएट किंवा एक्सरसाइज (ayurvedic tips to lose weight) पुरेसा नाही, त्यासाठी स्वतःला काही चांगल्या सवयी लावणं खूप महत्त्वाचं असतं. लहानसहान पण सातत्याने पाळलेल्या सवयी आपलं मेटॅबॉलिझम वाढवतात, भूक नियंत्रणात ठेवतात आणि वजन कमी करण्यात मदत करतात.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

आयुर्वेदानुसार, वजन कमी करण्यासाठी अशा कोणत्या ५ सवयी आहेत ज्या फॉलो (ayurvedic remedies for weight loss) केल्यास वेटलॉस झटपट होण्यास मदत होते ते पाहूयात. आयुर्वेदिक डॉक्टर, दीक्षा भावसार हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून वेटलॉस करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करायच्या याबद्दल सांगितले आहे.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट आणि एक्सरसाइज पुरेसे नाही, तर शरीर डिटॉक्स करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा शरीर डिटॉक्स होते, तेव्हा मेटॅबॉलिझम वाढते आणि त्यामुळे कॅलरीज जास्त वेगाने बर्न होऊ लागतात. यासाठी सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात लिंबू, चिमूटभर हळद आणि काही थेंब देशी गायीच्या तुपाचे मिसळून प्या. हे मिश्रण पचनशक्ती वाढवते आणि शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करते.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

डॉ. दीक्षा यांच्या मते, दिवसातील सर्वात मोठं किंवा जड जेवण दुपारी घ्यावं. आयुर्वेदानुसार, दुपारच्या वेळी आपला पाचनअग्नी सर्वाधिक तीव्र असतो. यासाठीच, ही वेळ जड व पोषणमूल्यांनी भरलेलं जेवण घेण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

खरंतर, थंड अन्नपदार्थ आपल्या पचन क्रियेला मंदावतात. त्यामुळे मेटॅबॉलिझमचा वेग कमी होतो. त्याऐवजी गरम आणि ताजं शिजवलेलं अन्न खा, जेणेकरून मेटॅबॉलिझम कायम सक्रिय राहील. जेव्हा मेटॅबॉलिझम जलद असतं, तेव्हा शरीर अधिक कॅलरीज जाळू शकतं आणि वजन कमी करणं अधिक सोपं होतं.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

वजन कमी करण्यासाठी हर्बल टी पिणे फायदेशीर ठरु शकते. डॉ. दीक्षा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी बडीशेप, धणे आणि जिरे यांची हर्बल टी घेऊ शकता. ही चहा शरीरातील चरबी जाळण्यास आणि पाचनशक्ती सुधारण्यास मदत करते. ही चहा जेवणानंतर प्यावी, म्हणजे ती अधिक फायदेशीर ठरते.

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

वजन कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे सूर्यास्तानंतर जेवण करणे टाळावे. कारण रात्री उशिरा जेवण केल्यास पचन क्रिया मंदावते आणि शरीरात चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण लवकर पूर्ण करावं, जेणेकरून शरीराला ते पचवायला पुरेसा वेळ मिळेल आणि वजन नियंत्रणात राहील.