नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

Updated:December 16, 2025 22:00 IST2025-12-16T22:00:00+5:302025-12-16T22:00:02+5:30

Adopt These 6 Habits Every Morning from New Year to Lose Weight : new year weight loss habits : daily morning routine for weight loss : अचानक डाएट, कठीण एक्सरसाइज किंवा ट्रेंडिंग फॅड्सपेक्षा डेली रुटीनमध्ये छोटे बदल केल्यास वेटलॉस होईल झरझर...

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

अनेकजण येत्या नवीन वर्षात वजन कमी करण्याचा ठाम संकल्प करतात, मात्र तो प्रत्यक्षात (Adopt These 6 Habits Every Morning from New Year to Lose Weight) उतरवण्यासाठी योग्य सवयी स्वतःला लावून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. अचानक डाएट, कठोर व्यायाम किंवा ट्रेंडिंग फॅड्सपेक्षा डेली रुटीनमध्ये छोटे - छोटे बदल केल्यास वजन झटपट आणि आरोग्यदृष्ट्या योग्य पद्धतीने सहज कमी करता येऊ शकते.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

वजन कमी करण्याची प्रक्रिया अनेकदा खूपच वेळखाऊ आणि कंटाळवाणी (daily morning routine for weight loss) वाटते, पण योग्य दिशा आणि काही खास सवयी स्वतःला लावून घेतल्यास, वेटलॉस करण्याचे टार्गेट पण अधिक वेगाने आणि उत्साहाने अगदी लगेच पूर्ण करु शकता.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी सकाळी मसालेदार नाश्ता करण्याऐवजी तुम्ही भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा. हाय - प्रोटीन नाश्ता केल्याने भूख कमी लागते आणि हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

वजन कमी करण्यासाठी आपण सकाळची सुरुवात १ ते २ ग्लास पाणी पिऊन करु शकता. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, पाणी प्यायल्याने भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

दर १५ ते २० दिवसांनी स्वतःचे वजन तपासणे, वेटलॉस करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकते. असे केल्याने वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि आपले आत्म - नियंत्रण देखील वाढेल.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

काही मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हांत बाहेर सूर्यप्रकाशात (Sunlight) घालवणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात वेळ घालवण्याने वजनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, यामुळे शरीरातील व्हिटॅमिन 'डी' ची (Vitamin D) कमतरता देखील पूर्ण होते.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

योग्य आहार आणि नियमित व्यायामाप्रमाणेच, वजन कमी करण्यासाठी झोपेचे वेळापत्रक तयार करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे ठरते.

नव्या वर्षात वजन कमी करायचं असेल तर आजपासून करा ६ गोष्टी, येत्या होळीपर्यंत म्हणजेच ३ महिन्यात व्हा फिट...

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी व्यायाम किंवा कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी नक्की करा. वजन कमी करण्यासाठी ही सवय खूपच फायदेशीर मानली जाते.