Join us   

पोट फुगल्यासारखं वाटतं- गॅसेसचा त्रास होतो? भाग्यश्री सांगते ५ पदार्थ खा- अपचन होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 12:07 PM

1 / 7
बाहेरचं काही खाण्यात आलं किंवा कधी खूप जास्त जेवण झालं तर आपल्याला अपचनाचा त्रास होतो. पाेट फुगल्यासारखं वाटतं, गॅसेस होतात.
2 / 7
असा त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती अभिनेत्री भाग्यश्री हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये भाग्यश्री सांगते की ब्लोटिंग म्हणजेच पोट गुबारण्याचा त्रास होत असेल तर आलं खूप जास्त उपयोगी ठरतं. यासाठी आलं टाकून केलेला बिना दुधाचा चहा घ्या. अपचनाचा त्रास कमी होईल.
4 / 7
बडिशेप बारीक चावून खाल्ल्यानेही अपचनाचा त्रास कमी होतो. बडिशेप बारीक चावून खा आणि त्यावर ग्लासभर कोमट पाणी प्या. आराम मिळेल.
5 / 7
वाटीभर ताजं दही खाल्लं तरी अपचनाचे अनेक त्रास कमी होऊ शकतात.
6 / 7
यानंतर गरमागरम वाफाळता ताजा भात खा. त्यावर तूप, मीठ आणि थोडं लिंबू टाकून घेतलं तर अधिक चांगलं.
7 / 7
पुदिना आणि काकडीचा एकत्रित ज्यूस करून प्यायल्यानेही पोट फुगल्यासारखं होणं, गॅसेस होणं असे त्रास कमी होऊ शकतात.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सभाग्यश्रीअन्न