1 / 9वजन कसं नियंत्रित ठेवावं किंवा वाढतं वजन कसं कमी करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण सध्या आपली लाईफस्टाईल एवढी जास्त बदलून गेलेली आहे की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि सगळ्यात आधी तो वाढत्या वजनाच्या स्वरुपात दिसून येतो...2 / 9वाढतं वजन कमी करण्यासाठी काय करावं असा विचार तुम्हीही करत असाल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा. काही दिवसांतच वजनात चांगलाच फरक पडलेला जाणवेल. 3 / 9रोज एक काकडी खा. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि डिहायड्रेशनचा त्रासही होत नाही. 4 / 9दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या. त्यामुळे शरीर हायड्रेटेड तर राहतेच पण शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर पडण्यासही मदत होते. म्हणजेच शरीर डिटॉक्स होते.5 / 9२ ते ३ किलोमीटर दररोज वॉकिंग करा. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.6 / 9रात्रीची झोप ही ७ ते ९ तासांची घ्यायलाच हवी. पुरेशी झोप झाली की शरीरातले हार्मोन्सही संतुलित राहतात आणि त्यामुळे वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. 7 / 9आहारातले साखरेचे प्रमाण तसेच मैद्याच्या पदार्थांचे प्रमाण पुर्णपणे कमी करा. यामुळे काही दिवसांतच इंचेस लॉस झाल्याचे जाणवेल. 8 / 9तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. त्यामुळे एनर्जी दिर्घ काळ टिकून राहण्यास मदत होते.9 / 9तेल- तूप कमी असणारे घरचे पदार्थच खा. बाहेरचे पदार्थ खाणं पुर्णपणे टाळा. यामुळेही वजन नियंत्रित ठेवण्यास बऱ्याच फायदा होईल.