स्वत:ला लावा या ७ सोप्या सवयी, जगणंच बदलून जाईल कायमचं! कमवा भरपूर पैसा आणि आनंद...
Updated:February 22, 2025 20:39 IST2025-02-22T20:29:44+5:302025-02-22T20:39:22+5:30
7 Morning Habits That Will Help You Lose Weight Fast : Healthy Morning Habits to Help You Lose Weight : Early morning habits that help with quick and effective weight loss : वजन कमी व्हायला लागले आणि बॉडी शेपमध्ये येऊ लागली की फार आनंद होतो, त्यासाठी या ७ सवयी आजच पाळा...

एकदा वाढलेलं वजन कमी करणे म्हणजे फार अवघड आणि कठीण (7 Morning Habits That Will Help You Lose Weight Fast) काम असते. वजन कमी करण्यासाठी बराच काळ योग्य डाएट (Healthy Morning Habits to Help You Lose Weight) आणि एक्सरसाइज योग्य पद्धतीने फॉलो करावी लागते. वजन कमी करण्यासाठी आपण डाएट आणि एक्सरसाइज तर करतोच. परंतु सोबत आणखी काही छोटे - मोठे उपाय केले तर वजन कमी करण्यात अधिक मदत होते.
वजन कमी करताना जर आपण काही गोष्टी लक्षात ( Early morning habits that help with quick and effective weight loss) ठेवल्या तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. यासाठी वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रवासांत डाएट आणि एक्सरसाइज सोबतच कोणत्या ७ सवयी सवतःला लावून घेतल्या पाहिजेत ते पाहूयात. या ७ सवयींमुळे तुमचे वजन हमखास कमी होण्यास अधिक मदत मिळते.
सवय १ :- कोमट पाणी किंवा ग्रीन टी प्या :-
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी किंवा ग्रीन टी प्या. कोमट पाणी वजन कमी करण्यासाठी अधिक असरदार करण्यासाठी त्यात लिंबाचा रस घालून देखील आपण पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. म्हणून, दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी किंवा ग्रीन टी प्या.
सवय २ :- जलद गतीने चाला :-
नियमितपणे वेगाने चालणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. प्रत्येक तासाला ६ किलोमीटर चालण्याचा वेग ठेवा. जलद गतीने चालण्याने देखील वजन कमी करण्यास मदत होते.
सवय ३ :- सकाळचा नाश्ता स्किप करु नका :-
सकाळचा नाश्ता कधीही स्किप करण्याची चूक करु नका. यामुळे वजन दुप्पट वेगाने वाढू शकते. सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा आणि पचण्यास हलका असावा. नाश्त्यात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश कायम ठेवा.
सवय ४ :- जंक फूडपासून दूर राहा :-
जर आपल्याला निरोगी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर जंक फूडपासून दूर राहा. जंक फूडमध्ये फार मोठ्या प्रमाणांत साखर आणि मिठाचे प्रमाण असते. ज्यामुळे वजन वाढू शकते.
सवय ५ :- व्हिटॅमिन 'डी' ची आवश्यकता :-
वजन कमी करण्याच्या प्रवासांत शरीराला व्हिटॅमिन 'डी' ची आवश्यकता असते. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन 'डी' हाडं आणि आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यासाठी सकाळच्या उन्हात १० ते १५ मिनिटे बसा किंवा हलके वॉकिंग करा.
सवय ६ :- भरपूर पाणी प्या :-
वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणे देखील गरजेचे असते. दिवसभरात कमीत कमी चार लिटर पाणी प्या. गरजेनुसार सतत पाणी पित राहा, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
सवय ७ :- पुरेशी झोप घ्या :-
वजन कमी करण्यासाठी झोप देखील तितकीच महत्वाची असते. यासाठी रात्रीची किमान ६ ते ७ तासांची झोप घेणे आवश्यक असते. कमी झोपणे किंवा पूर्ण झोप न घेणे यामुळे देखील मानसिक ताण येतो, यामुळेही वजन वाढू शकते.