पाण्यात टाकून प्या ६ पैकी कोणतीही १ गोष्ट! शरीरातील चरबी म्हणता म्हणता होईल गायब
Updated:March 25, 2025 19:24 IST2025-03-24T12:21:47+5:302025-03-25T19:24:19+5:30
Weight Loss Foods : मेटाबॉलिज्म बूस्ट करणाऱ्या काही गोष्टी पाण्यासोबत घेतल्या तर तुम्हाला लवकर फायदा मिळू शकतो. अशाच काही ७ गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे मेटाबॉलिज्म?
Weight Loss Foods : वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज आणि डायटिंगसोबतच इतरही काही गोष्टी करण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मेटाबॉलिज्म बूस्ट करणं. अशात मेटाबॉलिज्म बूस्ट करणाऱ्या काही गोष्टी पाण्यासोबत घेतल्या तर तुम्हाला लवकर फायदा मिळू शकतो. अशाच काही ७ गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातील कोणतीही एक गोष्टी पाण्यात टाकून प्यायल्यास चरबी जळून वजन लवकर कमी होण्यास मदत मिळेल.
काय आहे मेटाबॉलिज्म?
मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. याद्वारे सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते. आणखी साध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्मनं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्मीची क्रिया आपल्या शरीरात २४ तास सुरु असते. इतकंच काय तर आपण आराम करत असतानाही ही क्रिया सुरु असते.
लिंबू
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लिंबू हे वजन कमी करण्यासाठी सुपरफूड आहे. लिंबामधून शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. अशात मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका, थोडं काळं मीठ टाका आणि उपाशीपोटी प्या.
आलं
शरीरात जमा झालेली चरबी कमी करून वजन कमी होण्यासाठी आलं देखील खूप फायदेशीर मानलं जातं. हे वापरण्यासाठी आलं बारीक करून पाण्यात उकडून घ्या. यात थोडा लिंबाचा रस टाकून हे पाणी एक एक घोट प्यावं. आल्यामध्ये जिंजेरोल नावाचं तत्व असतं, ज्यामुळे पचन वाढतं आणि चरबी लवकर जळते.
पदीना
पदीन्याचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात काही पदीन्याची पानं टाकून रात्रभर भिजवून ठेवा. हे पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडं थोडं प्यावं. पदीन्यामध्ये रोस्मेरिनिक अॅसिड नावाचं एक अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे शरीरातील सूज कमी करून पचन वाढवतं.
दालचीनी
दालचीनी सुद्धा वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे. यानं भूक कमी होऊन शरीरातील चरबी घटते. सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. याचा वापर करण्यासाठी दालचीनी पावडर १० मिनिटं पाण्यात उकडून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर प्या.
हळद
हळदीचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो. याचा वापर तुम्ही वजन कमी करण्यासाठी देखील करू शकता. हळदीनं शरीरातील सूज कमी होते आणि चरबी सुद्धा जळते. तसेच लिव्हर डिटॉक्सही होतं. यासाठी दोन चिमूट हळद पावडर कोमट पाण्यात टाकून प्या. यात थोडी काळी मिरी पावडरही टाकू शकता.
ग्रीन टी
ग्रीन टी ला वजन कमी करणारा चहा म्हणून ओळखलं जातं. ग्रीन टी मुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. यानं कॅलरी बर्न होण्यासोबतच एनर्जी सुद्धा मिळते. ग्रीन टी तुम्ही थंड पाणी आणि लिंबाचा रस टाकून पिऊ शकता.