चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

Updated:July 3, 2025 13:47 IST2025-07-03T13:26:21+5:302025-07-03T13:47:22+5:30

How to Lower Thighs Fat : आपण सुद्धा मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर हा लेख तुमची मदत करू शकतो.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

How to Lower Thighs Fat : पोटावर वाढलेल्या चरबीसोबतच जगभरातील जास्तीत जास्त महिला गोल-मटोल झालेल्या मांड्यांमुळेही चिंतेत असतात. मांड्यांवरील चरबी वाढल्यानं महिलांना चालण्यात, धावण्यात, उड्या मारण्यात अशा गोष्टी करण्यात समस्या येतात. त्यामुळे मांड्यांवरील चरबी लवकरात लवकर कमी करणं गरजेचं असतं. जर आपण सुद्धा मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर हा लेख तुमची मदत करू शकतो. या काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या फॉलो करून मांड्यांवरील चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून किंवा जेवणातून जास्त मीठ खात असाल तर शरीरात जास्त पाणी तयार होतं. ज्यामुळे मांड्यांसहीत शरीरातील इतरही भागातील शेप बदलू लागतो. अशात शरीरात होणारं वॉटर रिटेंशन रोखण्यासाठी मीठ कमी खायला हवं. फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूडमध्ये मीठ जास्त असतं. या गोष्टीही टाळल्या पाहिजेत.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

इलेक्ट्रॉल्सचा अर्थ कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम होतो. या गोष्टीच्या माध्यमातून शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरातील फॅट वेगानं बर्न करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

कार्ब्स ग्लायकोजनमध्ये बदलून पाण्यासोबत मिळून लिव्हर आणि स्नायूंमध्ये जमा होतात. आपण जेवढे जास्त कार्बोहायड्रेट खाऊ, तेवढं जास्त पाणी शरीरात जमा होऊ लागतं. अशात कार्ब्स असलेले पदार्थ कमी खायला हवेत. जेणेकरून लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळेल.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

जर आपल्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल, तरीही मांड्यांवरील चरबी कमी करायची असेल तर लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. पायऱ्या चढणं हा मांड्यांवरील चरबी कमी करण्याचा परफेक्ट उपाय आहे. यानं मांड्याचे स्नायू मजबूत होतात आणि फॅट बर्निंग प्रोसेसही वेगानं होते.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

कार्डिओ मांड्या आणि कंबरेवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एक बेस्ट पद्धत आहे. यासाठी तुम्ही रनिंग आणि डान्सिंगसारखे पर्याय निवडू शकता.

चरबीने थुलथुलीत झालेल्या जाड मांड्या बारीक करण्याचे सोपे उपाय, जिमला न जाताही होईल फायदा...

सायकलिंग केल्यानं सुद्धा मांड्यांवर जमा फॅट कमी होतं. त्याशिवाय सायकल चालवल्यानं मांड्याचे स्नायू मजबूत होतात. त्याशिवाय आपण प्लॅटिपस वॉकही करू शकता. यात पाय पसरवून वॉक करावा लागतो.