वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

Updated:February 26, 2025 13:55 IST2025-02-26T13:45:45+5:302025-02-26T13:55:00+5:30

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

महाशिवरात्रीचा उपवास नेमका अशावेळी येत असतो जेव्हा वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे त्याचा थोडाफार त्रास सगळ्यांनाच होतो.(Mahashivratri 2025)

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

त्यात उपवास म्हणजे तेलकट तुपकट, जड पदार्थ बऱ्याच प्रमाणात खाल्ले जातात. असा उपवास आणि वातावरणातील वाढलेली उष्णता यामुळे शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊन काही जणांना डिहायड्रेशन होऊ शकतं. असं होऊ नये म्हणून कोणती पेयं यादिवशी आवर्जून घ्यावी, याविषयी डॉ. गीता श्रॉफ यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे.

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

यामध्ये डॉ. गीता सांगतात की डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून नारळपाणी प्या. त्यामुळे पोटात थंड वाटते आणि एनर्जी येते.

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

बेलाच्या फळाचं सरबत पिणंही या दिवसांत खूप चांगलं असतं. कारण ते थंड असल्याने उष्णतेचा त्रास होत नाही.

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

बडिशेप पाण्यात भिजवा आणि ते पाणी थोडं थोडं करून प्या. यामुळे डिहायड्रेशन होत नाही आणि शिवाय पचनसुद्धा चांगले होते.

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

लिंबू पाणी किंवा लिंबाचं सरबत प्यायल्यानेही डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. त्यात काळं मीठ घातल्यास ते अधिक पाचक होतं.

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

ताक हे उत्तम पेय मानलं जातं. ते प्रोबायोटिक असल्याने पचनासाठीही मदत करतं. ताकामुळे उपवासाच्या दिवशी खाल्ले जाणारे जड पदार्थ पचायला सोपे जातात, शिवाय पोटातही शांत वाटतं.