चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

Updated:March 19, 2026 18:55 IST2026-03-19T18:48:12+5:302026-03-19T18:55:51+5:30

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

चैत्र नवरात्रीचे उपवास ऐन उन्हाळ्यात असतात. त्यामुळे बराच त्रास होतो. उन्हाळ्यात आधीच अनेक जणांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यात उपवास म्हटलं की अजूनच गळून गेल्यासारखं होतं.(5 tips to avoid dehydration during Chaitra Navratri fast)

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

म्हणूनच उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे उपवास सुखकर होतील आणि संपूर्ण दिवसभर एनर्जी टिकून राहील.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. पण त्यासोबतच लिंबू सरबत, ताक, पन्हं, नारळपाणी, कोकम सरबत असे पदार्थही चांगल्या प्रमाणात घ्या. यामुळे शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

दुसरी गोष्ट म्हणजे ताजी फळं भरपूर प्रमाणात खा. कारण फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स यामुळे शरीरातली उर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यातही टरबूज, खरबूज, काकडी, संत्री ही फळं जास्त प्रमाणात खा.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

चहा, कॉफी, तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ, मसालेदार पदार्थ कमीतकमी प्रमाणात खा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास जास्त वाढतो.तहान लागण्याची वाट बघू नका. अधून मधून थोडं थोडं पाणी पित राहा.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

साबुदाणा, बटाटा असे पदार्थ खाण्यापेक्षा रताळे, भाजणीचं थालिपीठ, भगर असे पदार्थ खा.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

या दिवसांत राजगिराही भरपूर प्रमाणात खा. राजगिऱ्यातून कॅल्शियम आणि इतर अनेक पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे अशक्तपणा येत नाही.