महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल
Updated:March 8, 2024 13:11 IST2024-03-08T13:02:47+5:302024-03-08T13:11:04+5:30

महाशिवरात्रीला अनेक जण हौशीने उपवास करतात. त्यानिमित्ताने अनेक वेगवेगळे पदार्थही खातात. पण उपवासाचे तेलकट- तुपकट जड पदार्थ खाल्ल्याने मग अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो.
ॲसिडिटी, अपचन असा त्रासही अनेकजणांना होतो. हा त्रास टाळण्यासाठी उपवास करताना थोडी काळजी घ्या. यामुळे उपवासाचा कोणताही त्रास होणार नाही.
उपवासाच्या दिवशी चकल्या, चिप्स असे तेलकट- तुपकट पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे पचन व्यवस्थित होईल.
दिवसातून एकदा तरी ताज्या दह्याचं ताक प्या. हे ताक खूप आंबट नको. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
लिंबू सरबतही दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी प्या. यामुळे एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल.
सध्या बाजारात टरबूज, संत्री, मोसंबी अशी फळं मिळत आहेत. ही पाणीदार फळं उपवासाच्या दिवशी आवर्जून खावीत.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे उपवासाला नुसती काकडी किंवा काकडी आणि दही यांचं सलाड किंवा कोशिंबीर खा. उपवास आरामदायी होईल.