वजन कमी करायचंय? फक्त ५ गोष्टी करा- वजन कमी होईल शिवाय फिटनेस, एनर्जी खूप वाढेल
Updated:September 5, 2025 14:38 IST2025-09-05T14:31:08+5:302025-09-05T14:38:17+5:30

वजन कमी करायचं असेल तर या पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा.(5 tips for fast weight loss)
बऱ्याचदा असं होतं की वजन कमी करण्याच्या नादात अनेकांचा फिटनेस बिघडतो. खूप थकवा येतो. असं काही होऊ न देता वजन कमी करायचं असेल तर या काही गोष्टी पुढचे काही दिवस करून पाहा..(healthy way for weight loss)
डॉ. आशिष गौरव यांनी जनसत्ता टाईम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार वजन कमी करण्याच्या नादात कोणतेही जेवण किंवा नाश्ता चुकवू नका. नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण वेळेवर घ्या पण आहार मात्र मर्यादित ठेवा.
वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्यायाम करण्यावरही भर द्या. दररोज २० ते ३० मिनिटांसाठी कोणता ना कोणता व्यायाम नक्की करा.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणंही खूप गरजेचं आहे. कारण पुरेशी झोप मिळाली तर शरीरातले हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी खूप मदत होते.
दोन जेवणांच्या मधल्या वेळेत जर भूक लागली तर पाणी, ताक, बिनसाखरेचा पातळ चहा असे पदार्थ खा. लाह्या, मुरमुरेही खाऊ शकता. पण जंकफूड खाणे मात्र टाळा.
जेवणाच्या आधी फळं, सलाड, कडधान्ये खाण्यावर भर द्या. यातून भरपूर फायबर मिळतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जेवण कमी जाते.