1 / 7आपल्याला माहितीच आहे की रात्रीच्या जेवणात कोणतेही जड पदार्थ घेऊ नयेत. त्यामुळे तसे पदार्थ रात्री खाणं तर आपण टाळतोच.(5 food you should avoid in dinner)2 / 7पण त्याशिवाय इतरही असे काही पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असले तरीही रात्रीच्या जेवणात ते खाणं पुर्णपणे टाळलं पाहिजे. असे पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sakshilalwani_nutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(Avoid These 5 Foods at Dinner for Better Digestion )3 / 7त्यापैकी पहिला पदार्थ आहे पालक. पालकामध्ये पचनासाठी थोडे कठीण असणारे फायबर आणि लोह असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात जर पालकाचा पदार्थ खाल्ला तर त्यामुळे पोट फुगणे, अपचन असा त्रास होऊ शकतो.4 / 7दुसरा पदार्थ आहे फळं किंवा फळांचा रस, फ्रुट सलाड असे पदार्थ. फळांमध्ये असणाऱ्या साखरेमुळे रात्रीच्यावेळी पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचा परिणाम झोपेवरही होतो.5 / 7रात्रीच्या जेवणात कच्ची काकडी, कच्चे बीटरूट असे पदार्थ खाणंही टाळावं. कारण रात्रीच्यावेळी पचनशक्ती आधीच मंदावलेली असते. त्यात जर असे थंड पदार्थ खाल्ले तर पचनक्रिया आणखीनच बिघडते.6 / 7नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात कडधान्य खाणं योग्य आहे. पण रात्री जर तुम्ही ते खाल्ले तर त्यामुळे गॅसेसचा त्रास होऊन पोट दुखू शकते.7 / 7रात्रीच्या वेळी दही खाल्ले तर त्यामुळे शरीरात कफ तयार होऊ शकतो. तसेच रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही.