वजन कमी करायचंय? मग नाश्त्याला यापैकी कोणताही १ पदार्थ खा, सुटलेलं पोट होईल एकदम फ्लॅट...
Updated:April 27, 2024 17:50 IST2024-04-27T17:31:54+5:302024-04-27T17:50:46+5:30

वजन कमी करायचं असेल तर काही पदार्थ तुमच्या नाश्त्यामध्ये अवश्य असले पाहिजेत. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणताही १ पदार्थ आहारात घ्या.
यापैकी पहिला पदार्थ आहे काकडीचं सॅलेड. काकडीमध्ये पाण्याचे तसेच फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे काकडीचं सॅलेड अवश्य खा.
दुसरा पदार्थ आहे मोड आलेल्या मुगाची उसळ. यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
बीटरूटचं सॅलेड हा देखील एक अतिशय आरोग्यदायी आणि भरपूर प्रोटीन असलेला पदार्थ म्हणून ओळखला जातो. यामध्ये मोड आलेले मूग, काकडी असे पदार्थही तुम्ही टाकू शकता.
भरपूर लोह देणारा पालकही तुमच्या नाश्त्यामध्ये घ्या. किंवा वेगवेगळ्या भाज्या, डाळी टाकून पालकाचं सूप करा. यातूनही लोह, प्रोटीन, फायबर उत्तम प्रमाणात मिळेल.
वेगवेगळ्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्ये टाकून पनीरचं सॅलेड करा. यामध्ये पनीर फ्राय करून घाला. जेणेकरून प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात मिळतील.