लग्नाची तारीख जवळ येताच ‘हे’ पदार्थ खायला सुरुवात करा, लग्नात फेशियल न करताही चेहरा चमकेल
Updated:January 27, 2026 15:41 IST2026-01-27T13:50:30+5:302026-01-27T15:41:49+5:30

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग. या प्रसंगी आपण छान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. नवरा- नवरीच काय पण त्यांच्या जवळचे जे नातेवाईक, मित्रमंडळी असतात, त्यांनाही छानच दिसायचं असतं..(how to get bridal glow?)
म्हणूनच तुमचं स्वत:चं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं लग्न असेल आणि त्यात तुम्हाला तुमचं सौंदर्य खुलून आलेलं हवं असेल तर आतापासूनच पुढे सांगितलेले काही पदार्थ खायला सुरुवात करा (5 foods for naturally glowing skin). यामुळे तुमचं सौंदर्य आतून खुलून येईल आणि मग फेशियल, क्लिनअप न करताही त्वचा छान चमकेल.(5 foods for bridal glow)
त्यापैकी पहिला पदार्थ आहे डाळिंब. डाळिंबामधून ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. तसेच त्यातून लोह मिळते. त्यामुळे शरीराची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो.
दुसरा पदार्थ आहे गाजर. त्याच्यामध्ये असणारे बीटा कॅरोटीन त्वचेवर असणारे पिंपल्स, ॲक्ने, स्कार्स कमी करण्यासाठी मदत करतं. त्वचेवर पिंपल्समुळे जर खूप काळे डाग पडले असतील तर ते नैसर्गिकपणे घालविण्यासाठी गाजर खायलाच हवं.
त्वचेचं सौंदर्य आणि तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी तिला पुरेशा प्रमाणात खनिजे, इलेक्ट्रोलाईट्स आणि पाणी मिळायला हवं. हे तिन्ही घटक नारळ पाण्यातून मिळतात. त्यामुळे नारळपाणी नियमितपणे प्या.
बदाम देखील रोज खायला हवे. कारण त्यांच्यामधून मिळणारं व्हिटॅमिन ई त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं. यामुळे त्वचा मऊ, मुलायम होते.
तूप खाऊन रूप येतं हे अगदी खरं आहे. पण आपण नेमकं तूप कमी खातो. पण तुपामधून मिळणारे हेल्दी फॅट्स त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या आहारात तूपही नियमितपणे असू द्या.