1 / 7आपली बहिण किंवा भाऊ आपल्यासाठी किती खास असतो हे आपल्याला वेगळं कोणी सांगायला नको. लहानपणापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्या सुख-दुखा:च्या प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असणारे हे भावंडं आपल्यासाठी नेहमीच खास असते. बॉलिवूड कलाकारांमधील भावंडांचीही अनेकदा चर्चा होते. अशाच काही बहिण-भावांची, बहिणी-बहिणींची (World Sibling’s Day) आणि भावा-भावांची खास झलक....2 / 7सोनम कपूर सध्या तिच्या गर्भवती असण्यामुळे बरीच चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची ही तिन्ही मुले असून सोनम सगळ्यात मोठी आहे, त्यानंतर भाऊ हर्षवर्धन हा अभिनेता असून रेहा कपूर ही त्यांची सगळ्यात धाकटी बहिण असून ती निर्मितीच्या क्षेत्रात आहे. 3 / 7प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याची सोहा अली खान ही बहिण अभिनय क्षेत्रात असल्याने आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण या दोघांना सबा अली खान ही आणखी एक बहिण असून ती ज्वेलरी डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. या तिघांचे एकत्र फार कमी छायाचित्रे असल्याचे दिसते. 4 / 7ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा हे सख्खे बहिण भाऊ आहेत. त्यांच्यातील बॉंडींगबाबात आपण अनेक गोष्टी ऐकल्या असून अभिषेक प्रसिद्ध अभिनेता आहे तर श्वेता मॉडेल आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे.5 / 7करीना कपूर आणि करिष्मा कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणींची जोडी आहे. या दोघी अनेकदा आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत एकत्र दिसतात. दोघीही तितक्याच सुंदर असून ९० चे दशक त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 6 / 7झोया अख्तर आणि फरान अख्तर या बहिण भावांबाबतही अनेकदा बोलले जाते. त्यांच्यातील अमूल्य असे बॉंडिंग आपल्याला वेगवेगळ्या निमित्ताने दिसून येते. बहिण-भाऊ म्हणून या दोघांची केमिस्ट्री फारच छान असल्याचे दिसते. प्रसिद्ध गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची ही मुले आहेत.7 / 7 प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिचा सख्खा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्याबद्दल आपल्याला फारसे माहित नाही. तो प्रसिद् शेफ असून त्याचे पुण्यात कोरेगाव पार्क भागात एक लॉंज आहे. याशिवाय तो मधू चोप्रा यांच्यासोबत चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही कार्यरत आहे.