1 / 5तान्या मित्तल हे सोशल मीडियावर वेगाने प्रसिद्ध झालेलं नाव. बिग बॉस 19 या रिअॅलिटी शोमुळे देशभरात ओळख मिळालेली ही तरुण मुलगी, स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे सातत्याने चर्चेत राहते. ग्वालियरसारख्या शहरातून मोठ्या मंचावर पोहोचलेली तान्या सध्या फार चर्चेत आहे.2 / 5तान्याने कामाची सुरुवात अगदी छोटय़ा प्रमाणात केली होती, हँडमेड वस्तू विकण्यापासून स्वतःचा छोटा व्यवसाय उभा केला. तिचं ब्रँड Handmade With Love By Tanya हे आज तिच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ब्रँडमधून तिने बॅग्ज, फॅशन आयटम्स आणि हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट्स विकून स्वतःचं नाव सिद्ध केलं. सोशल मिडियाचा योग्य वापर करुन घेतला.3 / 5सोशल मीडियावर तान्या खूप सक्रिय आहे. तिचे फोटो, व्हिडिओ, तिचा लक्झरी लाइफस्टाइलचा अंदाज आणि काही वेळा तिची विधानं या सगळ्यामुळे लोक तिच्याबद्दल बोलत राहतात. ती स्वतःला स्पिरिच्युअल, प्रेरणादायी आणि मेहनती व्यक्ती म्हणून सोशल मिडियावर प्रेझेंट करते. 4 / 5काही वेळा तिच्या बोलण्याचे सूर लोकांना प्रेरक वाटतात, तर काही वेळा ते विवादात्मक ठरतात. बिग बॉसच्या घरामध्ये तिचे दावे, तिच्या वस्तूंबद्दलचे बोलणे आणि तिची बोल्ड शैली यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. 5 / 5सध्या तान्या पाणी पिण्यासाठी चांदीची बाटली वापरते हा विषय सोशल मिडियावर चांगला चालू आहे. चांदीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे तर आपण सारे जाणूनच आहोत. तान्याच्या हातात कायम ही चांदीची बाटली दिसते. त्यावर लोकं अनेक विनोदी कमेंट्सही करत आहेत. चांदीची बाटली पाहून काहीजण हरखून गेलेत, कौतुक करत आहेत तर काही टिका की इतरांना साधेपणा शिकवणारी मुलगी स्वत: चांदीची बाटलीच घेऊन फिरते.