1 / 9वाढत्या उष्णतेत एअर कंडिशनर (AC) ही एक गरज झाली आहे. प्रचंड गरम होत असल्याने सर्वांना आता एसी लागतोच. उन्हाळ्यात दुपारी एसीची थंड हवा खूप आराम देते, परंतु जर एसी खराब झाला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.2 / 9बऱ्याचदा लोक एसीची सर्व्हिसिंग वेळेवर करत नाहीत, ज्यामुळे मशीनच्या कामगिरीवर परिणाम होतो आणि ते लवकर खराब होतं. उन्हाळ्यात एसीचा वापर जास्त होतो, त्यामुळे या काळात एसीची देखभाल खूप महत्त्वाची ठरते.3 / 9जर तुम्ही उन्हाळ्यात दिवसभर एसी सुरू ठेवत असाल तर तुम्ही त्याची नियमित देखभाल केली पाहिजे. साधारणपणे तज्ञांच्या मते जर एखादा एसी ६०० ते ७०० तास चालला असेल, तर त्याची सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. यामुळे एसीची कूलिंग क्षमता अबाधित राहते आणि वीज वापर देखील कमी होतो.4 / 9एसी सतत वापरल्यानंतरही लोक त्याच्या सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करतात तेव्हा समस्या उद्भवतात. यामुळे केवळ कूलिंग कमी होत नाही तर एसी जास्त गरम होऊन ब्लास्ट देखील होऊ शकतो.5 / 9एसी कधीही १०-१२ तास सतत सुरू ठेवू नका, यामुळे कंप्रेसरवर खूप भार पडतो. जर तुमचा एसी ६०० तासांपेक्षा जास्त काळ चालू असेल, तर गॅस लीकेजसाठी त्याची तपासणी करत राहा.6 / 9एअरफ्लो आणि कूलिंग योग्य राहावं म्हणून एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करत राहा. बाहेरील युनिट अशा ठिकाणी बसवा जिथे थेट सूर्यप्रकाश येत नाही, अन्यथा कूलिंगवर परिणाम होऊ शकतो.7 / 9जर तुम्हाला तुमचं वीज बिल कमी ठेवायचं असेल तर २४ अंश सेल्सिअसवर एसी सुरू ठेवा, हे तापमान ऊर्जा वाचवण्यास मदत करतं. 8 / 9जर तुम्हाला तुमचा एसी उन्हाळ्यात कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहावा आणि वर्षानुवर्षे टिकावा असं वाटत असेल, तर त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करायला विसरू नका.9 / 9६००-७०० तासांच्या वापरानंतर एसीची सर्व्हिसिंग करणं ही सर्व्हिसिंग करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. मात्र बहुतेक लोकांना ही माहिती नाही.