विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

Published:March 21, 2024 06:28 PM2024-03-21T18:28:10+5:302024-03-21T18:35:49+5:30

Virat Kohli to Ranveer Singh, See Supersuccessful Dads Taking Paternity Leave! : पितृत्व रजा म्हणजे नक्की काय? ती नेमकी कधी घेतली जाते आणि का? स्टार्स बाबांनीही घेतला ब्रेक

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

वडील झाले हो! प्रत्येक पालक जगात येणाऱ्या मुलासाठी फार उत्सुक असतात. फक्त आईच मुलाला पोटात वाढवत नसून, सोबत वडील देखील दिवसरात्र एक करून बाळाच्या आईची काळजी घेत असतो. आई होममेकर असेल तर, तिला घरगुती कामामध्ये मदत किंवा तिला विश्रांती घेण्यास आपण सांगतो. पण जर महिला वर्किंग असेल तर, तिला मॅटर्निटी लिव्ह मिळते. महिलांनी डिलिव्हरीसाठी मॅटर्निटी लिव्ह घेतलेली आपण ऐकली असेल. पण पुरुषांनी पॅटर्निटी लिव्ह घेतलेली आपण कधी ऐकलं आहे का?(Virat Kohli to Ranveer Singh, See Supersuccessful Dads Taking Paternity Leave!).

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

आतापर्यंत बॉलीवूडच्या अनेक सेलेब्सने पॅटर्निटी लिव्ह घेतली आहे. सध्या रणवीर सिंग देखील पॅटर्निटी लिव्ह घेण्याच्या तयारीत आहे. पण पॅटर्निटी लिव्ह म्हणजे काय? आजवर ही लिव्ह आणखीन किती कलाकारांनी घेतलेली आहे. पाहूयात.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

पॅटर्निटी लिव्ह याला पितृत्व रजा देखील म्हणतात. प्रसूतीसाठी स्त्रियांना मिळते ती मॅटर्निटी लिव्ह आणि नवजात बालकाच्या संगोपनासाठी पुरुषांना मिळते ती पॅटर्निटी लिव्ह. पॅटर्निटी लिव्ह सहसा खाजगी आस्थापनांमध्ये मिळत नाही. पण सरकारी आस्थापनांमध्ये पॅटर्निटी लिव्ह मंजूर होऊ शकते. ही रजा घेण्यामागचे कारण म्हणजे, पित्याला जबाबदारीची जाणीव होणे. यासह बाळंतीण म्हणून बायकोच्या यातना समजून घेण्यासाठी ही सुट्टी महत्त्वाची ठरते.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

आतापर्यंत आपण सोशल माध्यमांवर पॅटर्निटी लिव्हबाबत ऐकलं असेल. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. दरम्यान, बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचंही बोललं जात आहे. शिवाय या दरम्यान, तो कोणताही नवीन प्रोजेक्ट घेणार नसल्याची चर्चा आहे.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

दरम्यान, क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाला असून, त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्याने पहिल्या मुलीच्यावेळीस म्हणजेच २०२१ साली पितृत्व रजा घेतली होती. मुलीचे स्वागत आणि पत्नी अनुष्का शर्माची काळजी यासाठी त्याने रजा टाकली होती. ही पितृत्व रजा बीसीसीआयने मंजूर केली होती.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

बी टाऊनमध्ये देखील पॅटर्निटी लिव्हबाबत प्रचंड चर्चा रंगली होती. अनेक प्रख्यात कलाकारांनी आपल्या मुलाची आणि पत्नीची काळजी घेण्यसाठी ही रजा घेतली आहे. दरम्यान, अभिनेता सैफ आली खान देखील पॅटर्निटी लिव्हमुळे चर्चेत आला होता. त्याने २०१६ साली पत्नी करीना कपूरची काळजी घेण्यासाठी सुट्टी घेतली होती. त्यावेळी दोघांना दुसरे पुत्ररत्न होणार होते.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

बी-टाऊनमधला आणखी एक प्रेमळ पिता शाहिद कपूरने देखील पितृत्व रजा घेतली होती. जेव्हा मीरा कपूर पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा गरोदर राहिली. दोन्ही प्रेग्नन्सीदरम्यान शाहीदने आपल्या पत्नीसाठी पॅटर्निटी लिव्ह घेतली होती.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

अभिनेता कुणाल खेम्मू आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने आपल्या पत्नीसाठी म्हणजेच सोहा अली खानची काळजी घेण्यासाठी पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. त्यांना इनाया नावाची मुलगी आहे.

विराट कोहली-रणबीर आणि रणवीर सिंग, पाहा पॅटर्निटी लिव्ह घेणारे सुपरसक्सेफुल बाबा!

फेसबुकचा सुप्रसिद्ध सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील पितृत्व रजा घेतली होती. पत्नी प्रिसिला चॅन गर्भवती असताना दोन महिन्यांचा त्यांनी पितृत्व ब्रेक घेतला होता. त्यांना मॅक्स आणि ऑगस्ट अशी दोन सुंदर मुले आहेत.