Join us
Daily Top 2 Weekly Top 5

काय सांगता विद्या बालनकडे आहेत फक्त २५ साड्या? आणि त्या साड्याही अशा आहेत की....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2024 18:25 IST

1 / 6
विद्या बालन आणि तिचे साडी प्रेम या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत. विद्या बहुतांशवेळा फक्त साड्यांमध्येच दिसून येते. साडी कॅरी करण्याची तिची पद्धत खरोखरच अतिशय देखणी आहे.
2 / 6
आता विद्या एक प्रख्यात अभिनेत्री. शिवाय तिला वेगवेगळ्या साड्या नेसण्याचा छंद. त्यामुळे तिचे साडीचे कलेक्शन खूप असणार, तिचा अख्खा वॉर्डरोब भरजरी साड्यांनी भरलेला असणार असं आपल्याला वाटतं.
3 / 6
पण सत्य परिस्थिती यापेक्षा खूपच वेगळी असून विद्या बालनच्या वॉर्डरोबमध्ये फक्त २५ साड्या आहेत. हल्ली एवढ्या साड्या तर कोणत्याही मध्यमवर्गीय महिलेच्या कपाटात दिसून येतात.
4 / 6
mid-day यांनी दिलेल्या वृत्तानुसार विद्याची नुकतीच एका यु- ट्यूब चॅनलने मुलाखत घेतली. त्यावेळी तिला तिच्या साड्यांच्या कलेक्शनबाबत प्रश्न विचारला असता तिने तिच्याकडे फक्त २५ साड्या असल्याचे सांगितले.
5 / 6
ती म्हणाली की मला कितीही आवडलेली असली तरी क्वचितच एखादी साडी पुन्हा नेसण्याची संधी मिळते. त्यामुळे मग पुन्हा नेसणं होणारच नसेल तर मी त्या साड्या माझ्याकडे कशाला साठवून ठेवू... त्यामुळे माझ्याकडच्या साड्या मी लगेचच देऊन टाकते.
6 / 6
विद्याच्या कलेक्शनमध्ये ज्या २५ साड्या आहेत, त्या प्रत्येक साडीमागे एक खास भावनिक कारण, आठवणी आहेत. त्यामुळे तिने त्या कपाटात सांभाळून ठेवल्या आहेत, असंही तिने त्या मुलाखतीत सांगितलं.
टॅग्स : सोशल व्हायरलविद्या बालनसाडी नेसणे