Join us

वापरलेली चहा पावडर फेकू नका! स्वयंपाकघरातील ६ काम होतील सहजसोपी - वाटेल आधी का नाही केला उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 10:05 IST

1 / 8
सकाळपासून, रात्रीपर्यंत आपल्यापैकी अनेकांच्या घरात अनेकदा (useful kitchen hacks of leftover tea leaves) चहा तयार केला जातो. प्रत्येक घरोघर रोज चहा बनवताना वापरलेली चहा पावडर उरते, आणि बहुतेक वेळा ती थेट कचराकुंडीत फेकली जाते.
2 / 8
पण तुम्हाला माहित आहे का, ही उरलेली (benefits of leftover tea leaves in kitchen) चहा पावडर म्हणजे स्वयंपाकघरातली (leftover tea leaves kitchen uses) एक उपयुक्त गोष्ट आहे. वापरलेली चहापावडर योग्य प्रकारे साठवली आणि वापरली, तर उरलेली चहा पावडर स्वयंपाकघरातील अनेक काम अगदी सहजसोपी करू शकते.
3 / 8
घरातील काचेच्या भांड्यांची चमक कमी झाली असेल आणि तेलाचे डाग धुतल्यानंतरही जात नसतील, तर त्यांची स्वच्छता करण्यासाठी उरलेल्या चहा पावडरचा वापर करू शकता. यासाठी, वापरलेली चहा पावडर पुन्हा पाण्यात उकळायची. मग या पाण्यात लिक्विड डिश वॉश आणि लिंबाचा रस मिसळून एक द्रावण तयार करा. या द्रावणाने काचेच्या भांड्यांची स्वच्छता करू शकता. यामुळे काचेच्या भांड्यांची चमक परत येईल आणि तेलाचे डागही निघून जातील.
4 / 8
ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जसे मस्त लालचुटुक रंगाची ग्रेव्ही असणारे छोले मिळतात, तसेच घरी तयार करण्यासाठी आपण या वापरलेल्या चहा पावडरचा वापर करू शकतो. यासाठी, उरलेली चहा पावडर स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ शकता. त्यानंतर, ती एका सुती कापडाच्या पोटलीत बांधून किंवा चहा पावडर पुन्हा पाण्यात उकळून ते पाणी गाळून छोल्यांमध्ये घालू शकता. यामुळे छोल्यांना छान लालसर असा रंग येईल.
5 / 8
उरलेल्या चहा पावडरचा वापर करून नॉन-स्टिक भांड्यांवर साचलेला चिकटपणा देखील स्वच्छ करू शकता. यासाठी, चहा पावडर पाण्यात घालून उकळायची त्यानंतर, त्यात थोडे व्हिनेगर घाला. हे पाणी नॉन-स्टिक भांड्यांवर थोडा वेळ घालून ठेवावे लागेल. या नंतर, मऊ स्क्रबरला डिशवॉश लावून भांडी स्वच्छ करा. नॉन-स्टिक पॅनवरील चिकटपणा आणि वास दोन्ही निघून जातील. त्याचबरोबर, यामुळे नॉन-स्टिक पॅनचे कोटिंग सुरक्षित ठेवण्यास देखील मदत होते.
6 / 8
चहा पावडरच्या मदतीने फ्रिजमधील दुर्गंधी देखील दूर करू शकता. यासाठी, एका ग्लासमध्ये चहा पावडर, थोडे पाणी, लिंबाचे तुकडे आणि बेकिंग सोडा घालून ते फ्रिजमध्ये ठेवावे. हे मिश्रण फ्रिजमधील दुर्गंधी शोषून घेईल आणि फ्रिज कायम फ्रेश राहील तसेच कुबट दुर्गंधी कमी होईल.
7 / 8
लाकडी कटिंग बोर्डवर जर कांद्याचा किंवा लसणाचा वास येत असेल, तर वापरलेली चहा पावडर घेऊन ती कटिंग बोर्डवर घासा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे वास निघून जाईल.
8 / 8
काहीवेळा स्वयंपाकघरातील कचरापेटीतून किंवा सिंकमधून दुर्गंधी येते. अशा वेळी, एका वाटीत वाळलेली चहा पावडर घेऊन ती दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी ठेवा. चहा पावडर नैसर्गिकरित्या दुर्गंधी शोषून घेते आणि वातावरण ताजेतवाने ठेवते.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी