फरशी पुसण्याच्या पाण्यात हे ५ पदार्थ घाला, फरशी होईल स्वच्छ आणि पावसाळ्यातल्या माशा-चिलटंही होतील गायब
Updated:August 2, 2025 17:22 IST2025-08-02T14:00:39+5:302025-08-02T17:22:30+5:30

घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोजच्या रोज फरशी पुसणे गरजेचेच आहे. ते आपण नियमितपणे करतो. पण ती स्वच्छता वरवरची तर होत नाही ना, याकडे एकदा लक्ष देणं गरजेचं आहे.
म्हणूनच फरशी पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून पुढे सांगितलेले काही पदार्थही आठवणीने घाला. यामुळे फरशी जास्त स्वच्छ होईल, अगदी चकाचक दिसेल आणि मुख्य म्हणजे अनेक सुक्ष्म जंतूही नष्ट होतील.
फरशी पुसण्याच्या पाण्यात अधून मधून केसांसाठी असणारे कंडिशनर घाला. यामुळे फरशीवर लवकर धूळ बसत नाही आणि छान चमक येते.
डिशवॉश लिक्विड घालून आठवड्यातून एकदा फरशी पुसा. यामुळे ती जास्त स्वच्छ झाल्यासारखी दिसेल.
दोन फरशांमध्ये असणारा गॅप अनेकदा काळा पडतो. त्यामुळे मग फरशी पुसूनही स्वच्छ होत नाही. हे टाळण्यासाठी अधूनमधून फरशी पुसण्याच्या पाण्यात कपड्यांसाठी असणारं फॅब्रिक सॉफ्टनर घाल. यामुळे दोन फरशांमधल्या जागेचा काळेपणा निघून जाईल.
व्हाईट व्हिनेगर तसेच मीठ घालून फरशी पुसल्यास घरातला कुबट वास नष्ट होतो आणि फ्रेश वाटते.
घरात लहान मुलं असतील तर बेकिंग सोडा मिसळलेल्या पाण्याने फरशी पुसा. यामुळे फरशीवरचे जीवजंतू नष्ट होतील.