Join us

देवघरासमोर, तुळशी वृंदावनापुढे काढण्यासाठी छोट्या रांगोळ्यांचे प्रकार, १ मिनिटांत होणाऱ्या सोप्या डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 09:38 IST

1 / 8
देवघरासमोर, तुळशी वृंदावनापुढे कशी रांगोळी काढावी हा प्रश्न पडतोच.. कारण तिथे जागा कमी असते आणि शिवाय झटपट काढून होईल अशी छोटीशीच रांगोळी हवी असते.
2 / 8
त्यामुळे देवघर आणि वृंदावनासमोर एकच एक प्रकारची रांगोळी काढून कंटाळला असाल तर हे काही वेगवेगळे रांगोळी डिझाईन्स पाहा..
3 / 8
या रांगोळी डिझाईन्स अगदी छोट्या आहेत. त्यामुळे कितीही लहान जागा असली तरी तिथे तुम्ही त्या काढू शकता.
4 / 8
अशा लहान लहान रांगोळ्या काढायला एखाद्या मिनिटापेक्षाही खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे सकाळच्या गडबडीत त्या अगदी झटपट काढता येतात.
5 / 8
काही जणी देवघरामसोर पाऊलं रोज काढतात. त्या डिझाईनमध्ये असा थोडासा बदलही करता येईल.
6 / 8
असं छोटंसं डिझाईन असेल तर त्यात रंगही पटकन भरता येतो. अगदी कमी वेळात छान रंगबेरंगी रांगोळी तयार होते.
7 / 8
जर देवघरासमोरची जागा अगदीच अरुंद असेल तर तिथे अशी पट्ट्याची रांगोळी काढता येऊ शकते.
8 / 8
प्रत्येक वाराच्या रांगोळ्याही असतात. त्यानुसार कोणता वार आहे ते पाहून त्यानुसारही तुम्ही रांगोळी काढू शकता.
टॅग्स : रांगोळीसोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनगृह सजावट