Join us

पावसाळ्यात कपड्यांवर चिखलाचे हट्टी डाग पडले? ६ उपाय, डाग निघतील पटकन, कपडे स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 16:40 IST

1 / 8
पावसाळा ऋतू सगळ्यांनाच आवडतो, पण या ऋतूंत येणाऱ्या अनेक अडचणी नकोशा (Tips & Tricks Monsoon Mud Stain Removal Clothes Home Remedies Tips) वाटतात. यातील एक सर्वसामान्य आणि मोठी समस्या म्हणजे पावसाळ्यांत कपड्यांवर उडणारा चिखल. अनेकदा पावसाळ्यात प्रवास करताना आपल्या कपड्यांवर पावसाच्या पाण्याचे तसेच चिखलाचे डाग पडतात. बहुतेक वेळा शाळेत जाणारी मुले तसेच ऑफिसला जाणाऱ्यांच्या कपड्यांवर असे डाग पडले तर ते दिसताना फारच वाईट दिसते.
2 / 8
खरंतर, कपड्यांवरील चिखलाचे डाग काढणे फारच कठीण काम असते. काहीवेळा तर अनेकदा कपडे धुवून देखील हे हट्टी डाग जाता जात नाही.यासाठीच, कपड्यांवरील चिखलाचे डाग काढण्यासाठी (Quick & Easy Tips How To Get Rid Of Mud Stains) ते फक्त धुवून उपयोग नाही, तर चिखलाचे डाग काढण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात.
3 / 8
काहीवेळा कपड्यांवर चिखलाचे डाग पडून ते सुकून जातात. सुकलेल्या चिखलाचे असे हट्टी डाग काढणे म्हणजे अधिकच कठीण काम असते. कपड्यांवर लागलेला चिखल ओला असताना चिखलावर थेट पाणी ओतल्यास तो कापडाच्या आत खोलवर शोषला जाऊ शकतो, ज्यामुळे डाग काढणे अधिक कठीण होते. चिखल सुकल्यानंतर, कोरड्या टूथब्रशने हळुवारपणे खरडवून काढून टाका. यामुळे डागाचा वरचा थर सहज निघून जाईल आणि नेहमीप्रमाणे कपडे धुवून घ्यावेत.
4 / 8
वाळलेला चिखल काढून टाकल्यानंतर, कपडे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. गरम पाणी वापरू नका कारण ते डाग अधिक प्रमाणात वाढवू शकते.
5 / 8
एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट थेट डाग असलेल्या भागावर लावा. बेकिंग सोडा नैसर्गिक क्लीनिंग एजंट असल्यामुळे तो डाग हलके करून संपूर्णपणे घालवण्यास मदत करतो. ही पेस्ट १० ते १५ मिनिटे डागांवर तशीच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे डाग हलके होऊन पूर्णपणे निघून जातात.
6 / 8
लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक अ‍ॅसिड असते, जे चिखलाचे डाग घालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. डाग असलेल्या भागावर थेट लिंबाचा रस लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून द्या. रस थोडा वेळ कपड्यावर राहू दिल्यास तो डागावर परिणाम करून हट्टी डागांना हलके करतो. त्यानंतर कपडे थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
7 / 8
जर चिखलाचे डाग अधिकच हट्टी असेल, तर एक कप पाण्यात २ चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळा. तयार झालेलं हे द्रावण थेट डागांवर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. व्हिनेगरमधील अ‍ॅसिडिक गुणधर्म डाग हटवण्यास मदत करतात आणि कपड्यावरील दुर्गंधी देखील दूर करतात. नंतर कपडे पुन्हा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
8 / 8
जर पांढऱ्या कपड्यांवर चिखलाचे डाग पडले असतील तर ते काढणे कठीण काम असते. थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साइड थेट डागांवर टाका आणि काही वेळ तसंच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. हा उपाय फक्त पांढरे कपडे किंवा रंग न उतरू शकणाऱ्या कपड्यांसाठीच वापरावा.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सपाऊसफॅशन