Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे शिक्षा, १० टिप्स - किचन राहील थंड - घामाघूम न होता करा स्वयंपाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 18:00 IST

1 / 15
रणरणत्या उन्हाळ्यात किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करणं म्हणजे अनेक गृहिणींसाठी मोठं अवघड काम...एकीकडे बाहेर कडकडीत ऊन आणि दुसरीकडे किचनमध्ये पेटलेला भयंकर उष्ण गॅस; अशा परिस्थितीत तासंतास उभं राहून स्वयंपाक करणं म्हणजे कोणत्याही गृहिणीसाठी मोठी कसरतच असते. आधीच बाहेर प्रचंड उकाडा असतो आणि त्यात गॅसची उष्णता मिळून किचन आणखी गरम होतं. त्यामुळे स्वयंपाक करताना घाम येणे, थकवा जाणवणे आणि अस्वस्थता वाढणे ही समस्या अनेकांना जाणवते. घामाच्या धारा, अंगाची होणारी लाहीलाही आणि वाढत्या उष्णतेमुळे येणारं थकवा यामुळे उन्हाळ्यात स्वयंपाक करणं नकोसं वाटतं(ways to reduce heat in kitchen during summer).
2 / 15
अशा परिस्थितीत, किचन थोडं थंडगार ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी (how to keep kitchen cool naturally) करण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास स्वयंपाक करणे तुलनेने सोपे होऊ शकते. योग्य वेंटिलेशन, काही छोट्या सवयी आणि किचनमधील व्यवस्थापन यामुळे उकाड्यातही किचन अधिक आरामदायी आणि थंडगार ठेवता येते.
3 / 15
कडाक्याच्या उन्हाळ्यात किचन थंड कसं ठेवायचं आणि उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोणते बदल करावेत, याच्या काही भन्नाट टिप्स पाहूयात...
4 / 15
स्वयंपाक करताना चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन आवर्जून लावा. हे नसेल तर खिडकीवर टेबल फॅन ठेवा. यामुळे गरम वाफ बाहेर पडून वातावरण थंड राहते. खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील.
5 / 15
थेट सूर्यप्रकाश येताना खिडक्या बंद ठेवा. संध्याकाळी खिडक्या उघडा जेणेकरून मोकळी व थंड हवा आत येईल.
6 / 15
स्प्रे बाटलीमध्ये थंड पाणी, पुदिन्याची पाने, गुलाब पाणी आणि इसेन्शिअल ऑईल मिसळा. हा स्प्रे ओटा, पडदे आणि भिंतीवर फवारा. यामुळे थंडावा व फ्रेशनेस राहतो.
7 / 15
खिडक्यांच्या काचेवर ॲल्युमिनियम फॉइल लावा. यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन किचन थंड राहण्यास मदत होते.
8 / 15
रांजण, माठ, मातीची भांडी यांचा वापर वाढवा. मातीच्या भांड्यांमधील नैसर्गिक ओलाव्यामुळे स्वयंपाकघर थंड राहते.
9 / 15
किचनच्या खिडकीवर किंवा दारावर ओले सुती कापड किंवा चटई अंथरा. यामुळे बाहेरून येणारी हवा थंड होते आणि थंडावा टिकून राहतो.
10 / 15
शक्य असल्यास, दुपारचं जेवण सकाळी लवकर (१० वाजेच्या आत) उरकून घ्या. दुपारच्या कडक उन्हात गॅसचा वापर टाळल्यास किचनमधील तापमान वाढत नाही.
11 / 15
जास्त मोठ्या फ्लेमवर स्वयंपाक केल्याने उष्णता जास्त बाहेर पडते. शक्यतो मंद किंवा मध्यम आचेवर स्वयंपाक करा. तसेच, प्रेशर कुकरचा वापर वाढवा ज्यामुळे गॅस कमी वेळ सुरू राहील.
12 / 15
ओव्हन, डिशवॉशर किंवा मिक्सर यांसारखी उपकरणे चालताना उष्णता निर्माण करतात. गरज असेल तरच त्यांचा वापर करा.
13 / 15
उन्हाळ्यात जास्त वेळ गॅसजवळ उभं राहावं लागू नये म्हणून झटपट होणारे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा.
14 / 15
प्रेशर कुकरमध्ये पदार्थ पटकन शिजतात. त्यामुळे गॅस कमी वेळ चालू राहतो आणि किचन कमी गरम होते. उदा. डाळ, भाजी किंवा भात एकाच वेळी बनवल्यास गॅस वारंवार चालू करावा लागत नाही.
15 / 15
भाज्या चिरणे किंवा काही तयारी रात्रीच करून ठेवल्यास सकाळी स्वयंपाक करताना वेळ कमी लागतो आणि उकाडाही फारसा सहन करावा लागत नाही.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्ससमर स्पेशलहोम रेमेडी