Join us

फ्रिजमध्ये बर्फ साचू नये म्हणून सोप्या टिप्स, फ्रिजरमध्ये होणार नाहीत बर्फाचे डोंगर-गळणार नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 14:59 IST

1 / 5
ज्यांच्याकडे सिंगल डोअर फ्रिज असतं, त्यांच्याकडे बऱ्याचदा फ्रिजरमध्ये जास्त बर्फ जमा होतो. असं होऊ नये म्हणून या काही गोष्टी तुम्ही करून पाहू शकता..
2 / 5
फ्रिजचं तापमान तुम्ही खूप जास्त थंड ठेवलं आहे का ते एकदा सेटींगमध्ये पाहा.. हिवाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसांत मध्यम किंवा कमी तापमान ठेवावे.
3 / 5
फ्रिजचं रबर खराब झालं असेल तर त्यामुळे फ्रिज व्यवस्थित बंद होत नाही. यामुळेही फ्रिजरमध्ये बर्फ साचून राहण्याचे प्रमाण वाढते.
4 / 5
फ्रिजमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वस्तू कोंबून ठेवत असाल तर त्यामुळेही आतल्या भागातला एअर फ्लो बंद होऊन फ्रिजमध्ये बर्फ साचून राहण्याचे प्रमाण वाढू शकते.
5 / 5
आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा फ्रिजचा डिफ्रोस्ट मोड सुरू करा. यामुळेही बर्फ साचण्याचे प्रमाण खूप कमी होईल.
टॅग्स : सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनसमर स्पेशलहोम अप्लायंस