Join us   

बबिताजी म्हणून फेमस झालेल्या मुनमुनच्या स्ट्रगलची गोष्ट, टप्पूशी अफेअरची चर्चा आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 6:11 PM

1 / 9
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta ka Ooltah Chashma) ही मालिका अल्पावधीत घराघरात पोहोचली. यातील पात्र प्रचंड गाजले. मुख्य म्हणजे जेठालाल यांची आवडती व्यक्ती अर्थात 'बबिता' जी (Babita Ji) म्हणजेच मुनमुन दत्ता या मालिकेद्वारे प्रकाशझोतात आली. परंतु, ती कायम कोणत्या ना कोणत्या वादाच्या फेऱ्यात अडकते. सध्या तिचं आणि टप्पू अर्थात अभिनेता राज अनाडकटचं साखरपुडा झालं असल्याचं बोललं जात आहे. पण नक्की खरं काय अन् खोटं काय? हे बबितालाच ठाऊक. पण ती नक्की कोण? (Munmun Dutta) तिचा या इंडस्ट्रीतला प्रवास कसा होता? पाहूयात(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Munmun Dutta, Information, Family and Love Affairs).
2 / 9
मुनमुन दत्ताचा प्रवास तसा मोठा. तिने या मालिकेआधी मॉडेलिंग, जाहिराती आणि चित्रपटसुद्धा केले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मुनमुन मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिंदी मालिकेतून ती भारतीयांच्या घराघरात पोहचली. या एका मालिकेने मुनमुन दत्ताला यशोशिखरावर पोहचवले.
3 / 9
मुनमुन दत्ताचा जन्म पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे २८ सप्टेंबर १९८७ रोजी झाला. तिचा जन्म बंगाली कुटुंबात झाला. तिचे आई-वडील दोघेही गायक आहेत. २०१८ साली तिच्या वडिलांचं निधन झालं. आईवडीलांप्रमाणेच मुनमुनलाही गायनाची आवड होती. तिने सुद्धा शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. तिला लहानपणी डॉक्टर व्हायचे होते. पण हळूहळू अभिनयाच्या वाटचालीकडे गेली.
4 / 9
मुनमुनचे शालेय शिक्षण ऑक्सफर्ड मॉडेल सीनियर सेकंडरी स्कूल, कानपूर, यूपी येथून झाले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी पुण्यात आली. नंतर इंग्रजी माध्यमातून कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या आईने तिला पत्रकारिता करण्याचा आग्रह धरला होता. तिने अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तर खरा, पण ग्लॅमरच्या दुनियेत तिला करिअर करायचं होते. त्यामुळे पत्रकारितेचा अभ्यासक्रम मध्येच सोडला आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीकडे ती वळली.
5 / 9
मुनमुन दत्ताने २००४ साली 'हम सब बाराती' या टीव्ही मालिकेद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. 'मुंबई एक्सप्रेस' हा तिचा पहिला चित्रपट होता. यात तिने सुपरस्टार कमल हसनसोबत स्क्रीन शेअर केली. परंतु त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. तिला खरी प्रसिद्धी ही टीव्हीनेच दिली.
6 / 9
२००८ साली तिला तारक मेहता का उल्टा चष्मा शो मिळाला. या शोमध्ये तिने बबीता अय्यर हे पात्र साकारलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन एका एपिसोडसाठी ३५ ते ५० हजार रुपये मानधन घेते. ती जवळपास १४ कोटींच्या संपत्तीच्या मालकीण असल्याची माहिती आहे.
7 / 9
लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, एकेकाळी मुनमुन ही अभिनेता अरमान कोहलीच्या प्रेमात पडली होती. हे दोघं सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्याच्या आक्रमक स्वभावामुळे हे नाते फार काळ टिकू शकले नाही असे म्हणण्यात येते. तिने या रिलेशनशिपबाबत अफवा असल्याचं म्हटलं आहे.
8 / 9
तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ‘अरमान कोहलीसोबत मी रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या खोट्या बातम्या पसरवणं थांबवा. मी गेल्या काही वर्षांपासून या चर्चांवर काही प्रतिक्रिया देत नव्हती. कारण त्या आपोआप शांत होतील असं मला वाटलं होतं. मात्र असं झालं नाही. कोणीही उठून माझ्याबद्दल काहीही बोलतंय. अशा फेक बातम्या छापणं बंद करा.'
9 / 9
अभिनयाव्यतिरिक्त मुनमुनला समाजसेवा करायला आवडते. ती मुलींच्या शिक्षणासाठी समाज जागृतीचे काम करते. तसेच, तिच्या घरातल्या कामवाल्या बाईच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा तिने घेतली आहे. यामुळे तिचे कौतुकही करण्यात येते.
टॅग्स : मुनमुन दत्तासोशल मीडियासोशल व्हायरल