1 / 10रोजच्या रोज दारापुढे कशी रांगोळी काढावी हा प्रश्नच पडतो. रांगोळी आणि रंग घेऊन आपण रांगोळी काढायला बसतो पण काय डिझाईन काढावं हेच सुचत नाही. त्यासाठीच बघा या काही सोप्या रांगोेळी डिझाईन्स.2 / 10या रांगोळ्या एवढ्या सोप्या आहेत की त्या तुम्ही अगदी एक ते दोन मिनिटांत काढू शकता.3 / 10सकाळच्या धावपळीत निवांत रांगोळी काढायला वेळ नसतोच. त्यामुळे हे डिझाईन तुम्ही अगदी झटपट काढू शकता.4 / 10रोज दारासमाेर अशी रांगोळी असावी जी चटकन उठून दिसावी, पण ती काढण्यासाठी जास्त वेळ लागू नये. हे त्याच प्रकारातलं डिझाईन आहे.5 / 10ही एक सुंदर रांगोळी पाहा. ही फुलं दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. शिवाय तुम्ही एक फुल काढलं तरी तुमची रांगोळी छान दिसेल.6 / 10या रांगोळीमध्ये रंग भरलेले असले तरीही ही रांगाेळी अजिबात वेळखाऊ नाही. तुम्ही ती खूप लवकर, झटपट काढू शकता.7 / 10रोज दारासमाेर काढायला हे एक साधं, सोपं डिझाईन पाहा..8 / 10ही रांगोळी तुम्ही नुसती अशीही काढू शकता किंवा थोडा वेळ असेल तर वेगवेगळे रंग वापरून तिला जास्त आकर्षकही करू शकता. 9 / 10सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यांना अशा पद्धतीची सोपी रांगोळी शिकवून ती तुम्ही त्यांच्याकडून रोज सकाळी दारापुढे काढून घेऊ शकता. मुलांचाही वेळ चांगला जाईल. काहीतरी नवं शिकायला मिळेल.10 / 10हे आणखी एक सोपं आणि खूप लवकर काढून होणारं रांगोळी डिझाईन.